Join us

कमी तेलकट-कुरकुरीत-गोल मेदूवडा करण्यासाठी ५ टिप्स; करा हॉटेलसारखा परफेक्ट मेदूवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 18:22 IST

How To Make Medu Vada : हॉटेलसारखा परफेक्ट मेदू वडा घरी करण्यासााठी  तुम्ही बॅटर तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी

मेदू वडा हा पदार्थ चविला उत्तम आणि हेल्दी असतो. (How To Make Medu Vada) सकाळच्या नाश्त्याला मेदू वडा खायला सर्वांनाच आवडते. लोक रेस्टोरंट किंवा हॉटेलमध्ये जाऊन इडली, डोश्याबरोबर मेदूवडासुद्धा खातात. मेदूवडा सांभार हे पदार्थ  हेल्दी आणि चवीलाही उत्तम लागतात. (Medu Vada Recipe) घरच्याघरी मेदू वडा करताना तुम्ही काही चुका टाळल्या तर परफेक्ट वडा घरीच तयार होईल. हॉटेलसारखा परफेक्ट मेदू वडा घरी करण्यासााठी  तुम्ही बॅटर तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Avoid These Mistakes While Making Medu Vada)

1) उडीदाची डाळ व्यवस्थित भिजवा

 मेदू वडा करण्याचे मुख्य साहित्य म्हणजे उडीदाची डाळ. जर तुम्ही उडीदाची डाळ व्यवस्थित भिजवून वडे केले तर वडे नेहमी कुरकुरीत आणि स्पंजी होतील. त्यासाठी उडीदाची डाळ नेहमी  ६ ते ७ तास भिजवून ठेवा आणि त्यानंतर सालं  काढून बॅटर तयार करा. 

2) डाळ वाटताना जास्त पाणी मिसळू नका

डाळ वाटताना तुम्ही योग्य प्रमाणात पाणी घातले नाही तर वड्याचे टेक्स्चर बिघडते. जास्त पाणी घातल्यास वडा कुरकुरीत होत नाही. सॉफ्ट आणि स्पंजी वडा तयार करण्यसााठी डाळ वाटताना नेहमीत कमी  कमी पाण्याचा वापर करा.  वाटण केल्यानंतर त्यात मीठ, मिरची, कांदा घालून व्यवस्थित फेटून घ्या. 

3) बॅटर व्यवस्थित फेटा

बऱ्याचजणांना माहित नसतं की मेदू वड्याचे बॅटर कसे फेटायचे.  जेणेकरून तो स्मूथ आणि सॉफ्ट बनले.  यासाठी मेदू वड्याचे बॅटर व्यवस्थित फेटून घ्या. 

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

4) कढईत जास्त प्रमाणात तेल घाला

मेदू वडा करण्यासाठी वडा पूर्णपणे तेलात बुडेल इतकं तेल घाला. तेल कमी असेल तर वडा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून होणार नाही, वडा मध्यम आचेवर ठेवा. 

5) जास्त कांदा घालणे

मेदू वड्याच्या मिश्रणात लोक जास्त प्रमाणात कांदा मिसळतात. ज्यामुळे वडा क्रिस्पी बनत नाही. जर तुम्हाला क्रिस्पी वडा बनवायचा असले तर कांद्याचे प्रमाण कमी ठेवा. मेदू वडा क्रिस्पी बनवण्यासाठी त्यात  अर्धा ते एक वाटी  तांदूळाचे पीठ मिसळा. यामुळे वडा क्रिस्पी बनेल.

कितीही खाल्लं तरी शरीर हाडकुळं दिसतं? १५ दिवसांत वजन वाढेल, हा घ्या साधा-सोपा आहार

याशिवाय चवही चांगली लागेल. स्पंजी आणि सॉफ्ट मेदू वडा करण्यासाठी बॅटरमध्ये चुटकीभर इनो किंवा बेकींग सोडा मिसळा.   याचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्या. इनो किंवा बेकींग सोडा घातल्यानं वडा जास्त तेल शोषू लागतात आणि त्यामुळे चव बिघडू शकते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न