Lokmat Sakhi >Food > टपरीवर मिळतो तसा कडक चहा मसाला करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा

टपरीवर मिळतो तसा कडक चहा मसाला करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा

How To Make Masala Chai At Home (Easy Masala Chai Recipe): चहामध्ये आले (Ginger) जास्त वेळ उकळले तर चहा नासण्याची शक्यता असते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:30 IST2025-08-19T16:08:54+5:302025-08-19T16:30:26+5:30

How To Make Masala Chai At Home (Easy Masala Chai Recipe): चहामध्ये आले (Ginger) जास्त वेळ उकळले तर चहा नासण्याची शक्यता असते.

How To Make Masala Chai At Home : Make Perfect Chai Recipe Tapristyle Chai At Home | टपरीवर मिळतो तसा कडक चहा मसाला करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा

टपरीवर मिळतो तसा कडक चहा मसाला करण्याची १ ट्रिक, चिंब पावसात घरीच प्या फक्कड चहा

पावसाळ्यात गरमागरम चहाची तल्लफ लागतेच. गेल्या २ दिवसांपासून मुसळदार पाऊस सुरू आहे (Cooking Hacks) अशा वेळी, गरमगरम आणि कडक चहाचा घोट घेणं म्हणजे स्वर्गसुखच! बाहेरच्या टपरीवर मिळणाऱ्या अमृततुल्य चहाची आठवण येते, जो एकदम कडक आणि परफेक्ट असतो. पण अनेकदा घरी चहा बनवताना तो पांचट होतो किंवा बिघडतो. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी टपरीवर मिळणारा 'परफेक्ट मसाला चहा' (Masala Chai) बनवू शकता. चहा बनवण्याची अचूक पद्धत आणि त्यासोबतच चहा बिघडू नये यासाठी काही खास टीप्स.(Make Perfect Chai Recipe Tapristyle Chai At Home)

टपरीसारखा परफेक्ट चहा बनवण्यासाठी खास टिप्स

1) पाणी आणि दुधाचे प्रमाण (Water and Milk Ratio): चहा पांचट होऊ नये यासाठी पाणी आणि दुधाचे प्रमाण योग्य असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही १ कप पाण्यासाठी अर्धा कप दूध वापरू शकता.

2) चहा पावडरचा वापर (Use of Tea Powder): चांगल्या ब्रँडची (Brand) चहा पावडर वापरा. चहा पावडर पाण्यामध्ये उकळायला ठेवा आणि ती चांगली उकळल्यावरच दूध घाला. यामुळे चहाला छान गडद रंग (Dark Color) येतो.

3) चहा उकळायला हवा (Boil the Tea): चहा चांगला उकळणे खूप महत्त्वाचे आहे. दूध घातल्यावर चहा किमान ३-४ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. चहा जितका जास्त उकळेल, तितका तो अधिक 'कडक' (Strong) आणि चविष्ट होईल.

4) आले योग्य वेळी घाला (Add Ginger at the Right Time): चहामध्ये आले (Ginger) जास्त वेळ उकळले तर चहा नासण्याची  शक्यता असते. म्हणून, आले नेहमी पाणी उकळायला लागल्यावर लगेच घाला.

5)  साखरेचे प्रमाण (Sugar Ratio): चहामध्ये साखर जास्त झाली तर तो गोड आणि पांचट वाटतो. योग्य प्रमाणात साखर वापरल्यास चहाला चव येते.

चहा करण्यासाठी लागणारं साहित्य (Ingredients)

१ कप पाणी 

अर्धा कप दूध 

१.५ चमचे चहा पावडर 

२ चमचे साखर 

१ छोटा तुकडा आलं 

२ वेलची 

२ लवंगा 

४-५ तुळशीची पानं.

चहाची कृती (Chai Recipe)

१) पाणी उकळायला ठेवा (Boil Water): एका भांड्यात १ कप पाणी घ्या. त्यात ठेचलेलं आलं, वेलची आणि लवंगा टाका. पाणी साधारण १-२ मिनिटं उकळू द्या, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध पाण्यात उतरेल.

२) चहा पावडर आणि साखर टाका (Add Tea Powder & Sugar): आता यात चहा पावडर आणि साखर टाका. चहा पावडर टाकल्यावर लगेच लगेच ढवळू नका. ती पाण्यावर तरंगू द्या. यामुळे चहाला छान रंग येतो. आता हे मिश्रण २-३ मिनिटं उकळू द्या.

3) दूध आणि तुळस घाला (Add Milk & Basil): चहाच्या मिश्रणाला छान रंग आल्यावर त्यात दूध आणि तुळशीची पानं टाका. चहाची चव वाढवण्यासाठी दुधाऐवजी 'कंडेन्स्ड मिल्क' (Condensed Milk) वापरू शकता.

4) मंद आचेवर उकळवा (Simmer on Low Flame): चहा उकळायला लागल्यावर गॅस मंद करा आणि चमच्याने सतत ढवळत राहा. यामुळे चहा अधिक घट्ट (Thick) आणि स्वादिष्ट होतो.

५) गाळून सर्व्ह करा (Strain and Serve): चहा ३-४ मिनिटं उकळल्यावर गॅस बंद करा. गरम चहा एका कपमध्ये गाळून घ्या आणि गरमागरम भजी किंवा वडापाव सोबत सर्व्ह करा.

Web Title: How To Make Masala Chai At Home : Make Perfect Chai Recipe Tapristyle Chai At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.