Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात घरीच करा गारेगार लस्सी, पाहा सोपी पद्धत-विकतच्या लस्सीपेक्षा भारी चव

उन्हाळ्यात घरीच करा गारेगार लस्सी, पाहा सोपी पद्धत-विकतच्या लस्सीपेक्षा भारी चव

How To Make Lassi At Home : लस्सीवर दुधाची जाडसर सायसुद्धा घातली जाते. ज्यामुळे लस्सीची चव अधिकच वाढते. (How To Make Lassi At Home)

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:56 IST2026-03-10T20:39:35+5:302026-03-10T20:56:13+5:30

How To Make Lassi At Home : लस्सीवर दुधाची जाडसर सायसुद्धा घातली जाते. ज्यामुळे लस्सीची चव अधिकच वाढते. (How To Make Lassi At Home)

How To Make Lassi At Home : Homemade Lassi Recipe How To Make Lassi Easy Way | उन्हाळ्यात घरीच करा गारेगार लस्सी, पाहा सोपी पद्धत-विकतच्या लस्सीपेक्षा भारी चव

उन्हाळ्यात घरीच करा गारेगार लस्सी, पाहा सोपी पद्धत-विकतच्या लस्सीपेक्षा भारी चव

उन्हाळ्याच्या दिवसांत काहीतरी थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा नेहमीच होत असते.अशावेळी तुम्ही थंडगार, चवदार लस्सी पिऊ शकता (Lassi Making Tips). नेहमीच बाहेरून लस्सी आणण्यापेक्षा  घरच्याघरी ताजं दही, दूध, साखर असे मोजके साहित्य घालून दह्याची लस्सी करण्याची सोपी रेसिपी पाहूया. दह्यापासून तयार केलेली लस्सी शरीर थंड ठेवण्यास मदत करते.  लस्सीवर दुधाची जाडसर सायसुद्धा घातली जाते. ज्यामुळे लस्सीची चव अधिकच वाढते. (How To Make Lassi At Home)

घरच्या ताज्या दह्याचा वापर करा.

 घरी लस्सी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ताजं थंड दही घ्या. घरी  केलेलं दही मलाईदार आणि घट्ट असते ज्यामुळे लस्सीला उत्तम टेक्सचर येतो आणि लस्सी चवदार लागते.

व्यवस्थित फेटून घ्या.

लस्सी करण्यासाठी तुम्ही दही कसं फेटता हे खूपच महत्वाचं असतं. दही व्यवस्थित फेटल्यानंतर लस्सी चविष्ट होते. दही फेटण्यासाठी ब्लेंडरचा वापर करा.  तुम्ही लाकडाच्या वरण घुसळण्याच्या यंत्राचाही वापर करू शकता.

जास्त पाणी घालू नका.

लस्सीमध्ये पाणी मिसळताना एकत्र जास्त पाणी न घालता हळूहळू अंदाज घेत पाणी घाला.ज्यामुळे लस्सीला क्रिमी आणि स्मूद टेक्सचर येईल. जास्त पाणी मिसळल्यास लस्सी खूपच पातळ होईल. जी चवीला चांगली  लागणार नाही.

बर्फाचे तुकडे मिसळा.

लस्सी फेटताना त्यात बर्फाचे तुकडे  घातल्यानं लस्सी घट्ट आणि क्रिमी होते. बर्फाचे तुकडे घातलेली लस्सी रिफ्रेशिंग असल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या दिवसांत पिणं फायेदशीर ठरतं.

क्रिम घाला.

 जर तुम्हाला लस्सी अजूनच क्रिमी करायची असेल तर दही फेटताना यात १ चमचा फ्रेश क्रिम किंवा वेनिला आईस्क्रीम मिसळा. ज्यामुळे खूपच घट्ट आणि मलाईदार होईल. तुम्ही आवडीनुसार यात गुलकंदही घालू शकता.

फळांचे काप घाला.

लस्सी करताना तुम्ही यात आवडीनुसार आंब्याचे छोटे काप, चिक्कूचे काप किंवा सफरचंदाचे बारीक काप करून घालू शकता. यामुळे लस्सीला नवीन ट्विस्ट येईल आणि लस्सी खूपच चवदार लागेल. काहीजण लस्सीमध्ये आंब्याचा रसही घालतात ज्यामुळे नवीन चव येते. 

Web Title : गर्मी को मात दें: घर पर बनाएं लस्सी, बाजार से बेहतर!

Web Summary : घर पर दही, दूध और चीनी से ताज़ा लस्सी बनाएं। ताज़ा, ठंडा दही इस्तेमाल करें, अच्छी तरह मिलाएं, धीरे-धीरे पानी डालें, बर्फ मिलाएं और स्वाद के लिए क्रीम या फल डालें। ठंडी, घरेलू लस्सी का आनंद लें!

Web Title : Beat the Heat: Homemade Lassi Recipe, Better Than Store-Bought!

Web Summary : Make refreshing lassi at home with fresh yogurt, milk, and sugar. Key tips include using fresh, cold yogurt, blending well, adding water gradually, mixing in ice, and adding cream or fruit for extra flavor. Enjoy a cool, homemade treat!