Join us

शिळ्या पोळ्यांचा खमंग कुस्करा ‘असा’ करा, ना वातड होणार ना गचका-झटक्यात होईल फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 14:33 IST

How To Make Kuskara From Leftover Chapati: उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा अतिशय चवदार होण्यासाठी बघा काही खास टिप्स...(simple tips and tricks for making delicious kuskara)

ठळक मुद्दे बऱ्याचदा कुस्करून घातलेले पोळ्यांचे तुकडे वातड, कडक होतात. त्यामुळे मग घरातले सगळे कुस्करा खायला नाक मुरडतात

प्रत्येक घरात नेहमीच घरातले सदस्य किती आहेत याचा अंदाज घेऊन माेजून मापून स्वयंपाक केला जातो. पण कधी कधी आपला अंदाज चुकतो आणि बऱ्याच पोळ्या उरतात. आता उरलेल्या पोळ्या पुन्हा भाजीसोबत खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. मग अशावेळी त्या पोळ्यांचं काय करायचं हा प्रश्न उरतोच.. म्हणून मग साधा सोपा पर्याय म्हणजे उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा करणे. आता काही जणींचं म्हणणं असं असतं की त्यांना कुस्करा चांगला जमतच नाही. बऱ्याचदा कुस्करून घातलेले पोळ्यांचे तुकडे वातड, कडक होतात (traditional maharashtrian recipe). त्यामुळे मग घरातले सगळे कुस्करा खायला नाक मुरडतात (simple tips and tricks for making delicious kuskara). तुमच्याही घरी असंच होत असेल तर कुस्करा जास्त चवदार होण्यासाठी ही एक सोपी रेसिपी पाहा..(how to make kuskara from leftover chapati?)

उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा करण्याची रेसिपी

 

साहित्य

३ ते ४ पोळ्या

१ मोठ्या आकाराचा टोमॅटो

१ मोठ्या आकाराचा कांदा

टाॅयलेटमध्ये बराच वेळ बसूनही पोट साफ होत नाही? रामदेव बाबा सांगतात उपाय- त्रास कायमचा संपेल

२ हिरव्या मिरच्या

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून लाल तिखट, हळद आणि साखर

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग

१ टेबलस्पून शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी पोळ्यांचे हाताने तुकडे करून घ्या आणि ते मिक्सरमध्ये फिरवून थोडे अर्धवट बारीक करून घ्या. यामुळे पोळ्यांचे तुकडे अजिबात वातड होत नाहीत. मिक्सर अगदी काही सेकंदापुरतंच फिरवावं. नाही तर पोळ्यांची अगदी भुकटी होऊन जाते.

तुम्हाला पाहून कुणीही म्हणेल ‘वॉव’! ५ गोष्टी करा, चाळिशी उलटल्याची एक खूण चेहऱ्यावर दिसणार नाही..

यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि तेल, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर मिरच्यांचे तुकडे आणि शेंगदाणे कढईमध्ये टाकून तेलामध्ये चांगले तळून घ्या. यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये घालून परतून घ्या. 

 

यानंतर एखादा मिनिट कढईवर झाकण ठेवा आणि कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ होऊ द्या. त्यानंतर ते चमच्याने थोडे दाबून एकजीव करून घ्या.

विद्या बालन ते भूमी पेडणेकर, कुणी १५ तर कुणी घटवलं २५ किलो वजन! कसं जमलं.. काय खाल्लं..

आता या मिश्रणात पोळ्यांचा चुरा घाला. त्याचवेळी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. त्यावर पाण्याचा हलका शिपका मारा आणि कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या. यानंतर मग सगळ्यात शेवटी चिमूटभर साखर, कोथिंबीर घाला आणि पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. यानंतर गॅस बंद करून टाका. गरमागरम, चवदार कुस्करा तयार.. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकिचन टिप्स