Lokmat Sakhi >Food > हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

Hotel Style Tawa Kulcha Recipe : How To Make Kulcha At Home : How to make kulcha without tandoor : Kulcha Recipe : कोण म्हणतं हॉटेलस्टाइल कुलचा घरी करता येत नाही ? ही घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 13:55 IST2025-05-08T13:16:35+5:302025-05-08T13:55:24+5:30

Hotel Style Tawa Kulcha Recipe : How To Make Kulcha At Home : How to make kulcha without tandoor : Kulcha Recipe : कोण म्हणतं हॉटेलस्टाइल कुलचा घरी करता येत नाही ? ही घ्या सोपी रेसिपी...

How To Make Kulcha At Home How to make kulcha without tandoor Kulcha Recipe Hotel Style Tawa Kulcha Recipe | हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

हॉटेलस्टाइल कुलचा घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, मऊसूत-पांढराशुभ्र कुलचा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

आपण कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टोरंटमध्ये गेलो की हमखास कुलचा ऑर्डर करतोच. मस्त चमचमीत, ग्रेव्ही असणाऱ्या मसालेदार भाज्यांसोबत कुलचा (Hotel Style Tawa Kulcha Recipe) खाण्याची मज्जा काही औरच असते. पांढराशुभ्र कुरकुरीत आणि मऊसूत असा कुलचा खायला सगळ्यांनाच आवडत. चमचमीत, मसालेदार भाज्यांसोबत कुलचा म्हणजे एकदम परफेक्ट पार्टनर आहे(How To Make Kulcha At Home).

असाच हॉटेल स्टाईल कुलचा ( Kulcha Recipe) आपण अनेकदा घरी तयार करून पाहतो, परंतु हा कुलचा हॉटेल सारखा घरी तयार होत नाही. आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींनी अनेकदा घरी कुलचा करण्याचा बेत देखील करुन पाहिलाच असेल, परंतु काहीवेळा हा बेत फसतो. हॉटेल्स्टाईल कुलचा घरी करणे म्हणजे अनेकींना कठीण वाटते. यासाठीच, हॉटेल स्टाईल कुलचा (How to make kulcha without tandoor) घरच्याघरीच तयार करण्यासाठी ही साधीसोपी रेसिपी पाहूयात.      

साहित्य :- 

१. मैदा - २ कप 
२. दही - १ कप 
३. मीठ - चवीनुसार
४. पाणी - १०० मि.ली
५. साखर - १ टेबलस्पून 
६. ड्राय यीस्ट - १ टेबलस्पून 
७. बटर - ४ ते ५ टेबलस्पून 
८. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)

आमरस काळा न पडण्यासाठी ८ टिप्स, महागामोलाच्या आंब्याचा रस राहील पिवळाधमक-चवही मस्त...


कोकणात करतात तशी पारंपरिक मसालेदार ग्रेव्हीवाली कच्च्या फणसाची भाजी, अस्सल गावरान चव...

कृती :-

१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात साखर, आणि यीस्ट घालून सगळे जिन्नस हलवून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवून द्यावे. 
२. एका मोठ्या परातीत मैदा, दही व चवीनुसार मीठ घालावे. आता यात फुलून आलेले यीस्टचे मिश्रण घालावे. आता सगळे जिन्नस एकत्रित करून हलकेच पाण्याचा हात लावून कुलच्यासाठी मऊसूत पीठ मळून घ्यावे. 
३. मळून घेतलेलं पीठ ३० मिनिटे झाकून ठेवावे. ३० मिनिटानंतर पाहिल्यास पीठ फुलून दुप्पट झालेले असेल. या फुलून आलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्यावेत. 

कोथिंबिरीची हिरवीगार जुडी आणली, मग कोथिंबीर पुरीचा बेत तर हवाच, टी - टाईम स्नॅक्ससाठी टेस्टी पदार्थ...

४. आता एक - एक गोळा घेऊन त्याला किंचितसा सुका मैदा लावून कुलचा लंबगोलाकार आकारात लाटून घ्यावा. 
५. गरम पॅनवर तयार कुलचा घालून तो दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यावा. 
६. कुलचा भाजल्यावर सगळ्यात शेवटी त्यावर बटर आणि कोथिंबीर भुरभुरवून घालावी. 

गरमागरम कुलचा खाण्यासाठी तयार आहे. कोणत्याही मसालेदार, ग्रेव्हीच्या भाजीसोबत कुलचा खायला अधिकच टेस्टी लागतो.

Web Title: How To Make Kulcha At Home How to make kulcha without tandoor Kulcha Recipe Hotel Style Tawa Kulcha Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.