सध्या सणावाराचे दिवस सुरु आहेत. कोणताही सणवार म्हटलं की गोडधोड आणि पारंपरिक पदार्थांची रेलचेल असतेच. गोडाधोडाचे पदार्थ म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा घालणे ओघाने आलेच. गोडाच्या बहुतेक सगळ्याच पदार्थांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स घालतोच. ड्रायफ्रूट्स घातल्याने कोणत्याही गोडाच्या (how to make kishmish or raisins from green grapes in 8 minutes at home) पदार्थाची चव दुपटीने वाढते. याच ड्रायफ्रुटसमधील सगळ्यांत महत्वाचा आणि आरोग्यदायी सुकामेवा म्हणजे बेदाणे. बेदाणे दिसायला आकाराने लहान असले तरी, चवीला (green grapes to raisins quick method) उत्तमच लागतात. याचबरोबर कोणत्याही पदार्थात बेदाणे घातल्यास त्याची चव अधिकच स्वादिष्ट लागते. बेदाणे हे आपल्या आरोग्यासाठी तितकेच पौष्टिक व उपयुक्त असतात. बेदाणे आपण शक्यतो बाजारांतून विकतच आणतो( instant kishmish making at home).
बाजारात मिळणारे बेदाणे अनेकदा महाग असतात किंवा त्यांची गुणवत्ता हवी तशी नसते. इतकंच नाही तर सणावाराच्या निमित्ताने भेसळयुक्त आणि चढ्या किंमतीत हे बेदाणे विकले जातात. यासाठीच, बाजारांतून महागडे बेदाणे विकत घेण्यापेक्षा आपण घरच्याघरीच अगदी स्वस्तात, फारशी मेहेनत न घेता झटपट बेदाणे तयार करु शकतो. ही घरच्याघरीच बेदाणे तयार करण्याची पद्धत खूपच सोपी असून त्यासाठी कोणत्याही खास उपकरणाची गरज लागत नाही. सध्या द्राक्षांचा सिझन नसला तरी आपण द्राक्षांचा हंगाम सुरु झाला की भरपूर द्राक्ष विकत आणतो. अशावेळी विकत आणलेली द्राक्षे खराब होऊन वाया जाऊ नये म्हणून आपण झटपट त्याचे बेदाणे तयार करु शकतो. फक्त ५० रुपयांपेक्षा कमी खर्चात ३०० रुपये किलोंनी बाजारांत मिळणारे बेदाणे तयार करण्याची साधीसोपी घरगुती ट्रिक पाहूयात...
द्राक्षांपासून बेदाणे घरीच तयार करण्याची सोपी पद्धत...
१. घरच्याघरीच द्राक्षांपासून बेदाणे तयार करण्यासाठी आपण लांब किंवा गोल कोणत्याही आकाराची द्राक्षे घेऊ शकता. द्राक्षांचा आकार मोठा असेल तर बेदाणाही मोठा होतो. द्राक्षे व्यवस्थित धुवून घ्या, जेणेकरून त्यांच्यावरील धूळ-माती निघून जाईल. त्यानंतर, द्राक्षे त्यांच्या देठापासून वेगळी करा. जर द्राक्षांमध्ये बिया असतील तर त्या काढून टाका. पण, बाजारात बिया नसलेली द्राक्षेही सहज मिळतात.
गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...
२. बेदाणे तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. आता इडलीच्या साच्यात ही धुतलेली द्राक्षे ठेवा. जर तुमच्याकडे इडलीचा साचा नसेल, तर तुम्ही चाळणीचा देखील वापर करू शकता. चाळणी भांड्यावर अशा प्रकारे ठेवा की ती पाण्याला स्पर्श करणार नाही, फक्त पाण्याची वाफ द्राक्षांना योग्य प्रकारे मिळेल याची खात्री करा.
३. द्राक्षांना वाफ देणे यासाठी आवश्यक आहे, कारण यामुळे द्राक्षांचा नैसर्गिक गोडवा आणि पोषक तत्वे टिकून राहतात. वाफेवर शिजवल्यामुळे द्राक्षांचे बाहेरील आवरण मऊ होते, ज्यामुळे ती सुकण्यासाठी तयार होतात. ही प्रक्रिया बेदाण्याच्या चवीत आणि गुणवत्तेत वाढ करते. द्राक्षे साधारण ८ मिनिटे वाफेवर शिजवा. द्राक्षांचा रंग बदलू लागल्यावर गॅस बंद करा आणि त्यांना बाहेर काढा.
४. वाफ दिल्यानंतर द्राक्षे व्यवस्थित सुकवून घ्यावी. तुम्ही ती हलक्या उन्हात किंवा पंख्याखाली सुकवू शकता. त्यांना थेट कडक उन्हात ठेवू नका, कारण यामुळे बेदाणे कडक होऊ शकतात. एका पातळ सुती कपड्यावर बेदाणे पसरवून ठेवा, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि लवकर सुकतील. सुकवण्यासाठी चुकूनही प्लास्टिकचा वापर करू नका, कारण त्यामुळे द्राक्षांमध्ये ओलावा टिकून राहील आणि ती खराब होऊ शकतात.
५. द्राक्षांना पूर्णपणे सुकण्यासाठी २ ते ३ दिवस लागू शकतात. जेव्हा द्राक्षे पूर्णपणे सुकतील, आकसतील आणि त्यांचा रंग गडद होईल, तेव्हा समजा की स्वादिष्ट बेदाणे खाण्यासाठी तयार आहे. अशाप्रकारे, तुम्हाला फक्त ८ ते १० मिनिटे मेहनत घ्यावी लागेल आणि त्यानंतर वाफवलेली द्राक्षे सुकवायला ठेवायची आहेत. अशाप्रकारे द्राक्षांपासून केमिकलशिवाय तयार केलेले बेदाणे आपण स्टोअर करुन ठेवू शकता.