कसूरी मेथी हा असा एक पदार्थ आहे जो तुमच्या पंजाबी पद्धतीने केलेल्या भाज्यांना अप्रतिम सुगंध, चव आणि टेक्स्चर देतो. जेव्हा आपण एखाद्या भाजीत कसुरी मेथी हलकीशी चुरून टाकतो, तेव्हा त्या भाजीची चव आणखी खुलून येते. एवढंच नाही तर बटाट्याचे पराठे, पनीर पराठे किंवा इतर कोणत्याही भाज्यांच्या पराठ्यांमध्येही कसुरी मेथी खूप छान लागते. त्यामुळे आपल्या स्वयंपाक घरात ती नेहमीच असते. कसुरी मेथी जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेलात तर त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. पण जर सध्या स्वस्त मिळणारी मेथीची भाजी तुम्ही घेतली तर त्यापासून अगदी सोप्या पद्धतीने घरच्याघरी कसुरी मेथी तयार करू शकता (how to make kasuri methi at home?). त्यासाठी काय करायचं ते पाहा..(cooking tips to make kasuri methi at home)
घरच्याघरी कसूरी मेथी कशी तयार करावी?
सध्या मेथीची भाजी १० ते १५ रुपयाला एक जुडी याप्रमाणे मिळत आहे. उन्हाळा सुरू झाला की हे भाव खूप वाढतात. शिवाय मेथी ताजीही मिळत नाही. त्यामुळे आता लगेचच बाजारातून एक मेथीची जुडी घेऊन या आणि लगेचच घरच्याघरी कसुरी मेथी करून पाहा.
यासाठी मेथी निवडून घ्या. त्यानंतर ती पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. आता ती एखाद्या पसरट चाळणीमध्ये ठेवा आणि तिच्यातले पाणी पूर्णपणे निथळून घ्या. पाणी निथळून गेल्यानंतर एक स्वच्छ सुती कपडा अंथरा. त्यावर धुतलेली मेथी पसरवून टाका. मेथी थेट उन्हात वाळत घालू नका.
कारण त्यामुळे तिची चव, रंग आणि सुगंध कमी होत जातात. २ ते ३ दिवसांत मेथी सुकते. यानंतर ती हाताने चुरून पाहा. ती जर कुरकुरीत वाटली तर मग एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
महाशिवरात्री : साबुदाणा वडे मऊ पडतात, खूप तेल पितात? घ्या खमंग खुसखुशीत वड्यांची सोपी रेसिपी
काचेची बाटली पुर्णपणे कोरडी असेल याची काळजी घ्या. शिवाय त्या बाटलीतून मेथी घेताना तिला वारंवार ओलसर हात लागणार नाहीत याकडेही लक्ष द्या. घरी तयार केलेल्या कसूरी मेथीचा रंग, सुगंध आणि चव विकत मिळणाऱ्या मेथीपेक्षा खूप उत्तम असतो. एकदा ट्राय करून पाहा.
Web Summary : Enhance your dishes with homemade Kasuri Methi! For just ₹10, learn to easily prepare it at home from fresh fenugreek leaves. This adds aroma, flavor, and saves money compared to store-bought options. Dry washed leaves and store in a dry jar.
Web Summary : घर पर कसूरी मेथी बनाकर अपने व्यंजनों को स्वादिष्ट बनाएं! केवल ₹10 में, ताज़ी मेथी की पत्तियों से इसे आसानी से बनाना सीखें। यह खुशबू और स्वाद जोड़ता है, और स्टोर से खरीदी गई मेथी की तुलना में पैसे भी बचाता है। धोकर सुखाएं और सूखे जार में स्टोर करें।