Join us

करंजीचे सारण फसते, करंजी होते खुळखुळा? पाहा करंजीचं सारण करण्याचं परफेक्ट प्रमाण, करंजी होईल खुसखुशीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 19:12 IST

How To Make Karanji Saran Perfect : Karanji Filling Recipe : करंजी करताना सारण चवीला उत्तम होण्यासाठी पाहा सारणाची स्पेशल रेसिपी आणि साहित्याचे अचूक प्रमाण...

दिवाळी म्हटलं की फराळ आणि फराळाच्या ताटात करंजी नसेल तर काहीतरी अपूर्ण वाटतं! फराळाच्या ताटातील गोडाधोडाची करंजी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच (Karanji Filling Recipe) विशेष आवडीची. करंजीचे आवरण बाहेरुन खुसखुशीत आणि आतील सारण चविष्ट असेल तरच करंजी खाण्याचा आनंद अगदी मनापासून घेता येतो. असे असले तरीही, अनेक गृहिणींची कायम हीच तक्रार असते की, करंजीचे सारण नेहमी फसते(How To Make Karanji Saran Perfect).

कधी करंजीच सारण ओलं राहतं, कधी कोरडं पडतं, तर कधी चवीला बिघडते, त्यामुळे करंजीचा संपूर्ण स्वादच निघून जातो. करंजीचे सारण परफेक्ट होण्यासाठी योग्य प्रमाण आणि साहित्याची अचूक मिक्सिंग पद्धत माहिती असेल, तर करंजी प्रत्येक वेळी परफेक्ट तयार होते. जर तुम्हालाही या दिवाळीला न बिघडणारे, खमंग आणि उत्तम चवीचे परफेक्ट सारण तयार करायचे असेल, तर खास रेसिपी, साहित्याच्या अचूक प्रमाणाचे गणित समजून घेणे गरजेचे आहे. 

साहित्य (सारणासाठी) :- 

१. सुकं खोबरं - १ वाटी २. बारीक रवा - १ वाटी ३. पिठीसाखर - ३/४ वाटी ४. मिल्क पावडर किंवा खवा - १/४ वाटी५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ६. बदाम, काजू, मनुका - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेला सुकामेवा)७. खसखस - १ टेबलस्पून (भाजलेली)८. साजूक तूप - १ टेबलस्पून 

दिवाळीचा फराळ झटपट होण्यासाठी खास टिप्स! गडबड - गोंधळ न होता, पदार्थ न बिघडता करा झटकेपट पदार्थ...

तळलेले पदार्थाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही, घ्या ८ टिप्स- तेल वाचवा करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ....

कृती :- 

१. रवा आणि नारळ भाजणे :- कढईत थोडंसं तूप गरम करून आधी रवा हलक्या आचेवर गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईत किसलेलं सुक खोबरं घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.

२. साखर आणि खवा मिसळणे :- गॅस बंद करून त्यात पिठीसाखर घाला आणि नीट मिक्स करा. साखर घातल्यानंतर गॅस चालू ठेवू नका, नाहीतर साखर वितळते आणि सारण ओलं होतं. 

चकली भाजणीचे अचूक प्रमाण! आता चकली न बिघडता होईल खुसखुशीत - पाहा भाजणीचे पारंपरिक सिक्रेट.... 

३. सुगंध आणि स्वाद :- आता या मिश्रणात खवा किंवा मिल्क पावडर, वेलची पूड, भाजलेली खसखस आणि चिरलेला सुकामेवा घाला. सगळं एकत्र हलवून घ्या, सुगंध आला की समजा सारण तयार आहे. 

४. सारण थंड होऊ द्या :- सारण पूर्णपणे थंड झाल्यावरच करंजीच्या कणकेत भरायला घ्या.

 हेच खमंग सारण तुम्ही पारंपरिक तळलेल्या करंजीत किंवा एअर फ्रायर/ओव्हनमध्ये तयार केलेल्या हेल्दी करंजीतही वापरू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect Karanji Filling Recipe: Avoid failures, get a crispy, delicious treat.

Web Summary : Many struggle with Karanji filling, but a perfect recipe ensures delicious results. Key ingredients include coconut, semolina, sugar, and dry fruits. Roast ingredients properly and mix carefully. Cool completely before filling for best results.
टॅग्स :दिवाळी २०२५अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स