Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > १ वाटी रव्याचे इंस्टंट अप्पे; टम्म फुगलेले मऊ अप्पे करण्याची पाहा परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

१ वाटी रव्याचे इंस्टंट अप्पे; टम्म फुगलेले मऊ अप्पे करण्याची पाहा परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

How To Make Instant Rava Appe : जेव्हा तुम्हाला काहीतरी हलकं आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते तेव्हा रवा अप्पे हा उत्तम पर्याय ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:08 IST2026-01-28T15:17:56+5:302026-01-28T18:08:58+5:30

How To Make Instant Rava Appe : जेव्हा तुम्हाला काहीतरी हलकं आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते तेव्हा रवा अप्पे हा उत्तम पर्याय ठरतो.

How To Make Instant Rava Appe : Rava Appe Recipe How To Make Instant Rava Appe | १ वाटी रव्याचे इंस्टंट अप्पे; टम्म फुगलेले मऊ अप्पे करण्याची पाहा परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

१ वाटी रव्याचे इंस्टंट अप्पे; टम्म फुगलेले मऊ अप्पे करण्याची पाहा परफेक्ट रेसिपी आणि प्रमाण

इस्टंट रवा अप्पे (Instant Rava Appe) हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी घाईच्या वेळेत मुलांना डब्यात देण्यासाठी अत्यंत पौष्टीक आणि चविष्ट आहे. हे झटपट होणारे दाक्षिणात्य पदार्थ आहेत. या पदार्थाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी डाळ-तांदूळ भिजवण्याची किंवा पीठ आंबवण्याची गरज नसते. जेव्हा तुम्हाला काहीतरी हलकं आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते तेव्हा रवा अप्पे हा उत्तम पर्याय ठरतो. हे अप्पे करण्यासाठी बारीक रवा, ताक किंवा दही आणि आवडीनुसार भाज्यांचा वापर केला जातो.  (How To Make Instant Rava Appe)

सगळ्यात आधी एका भांड्यात रवा आणि दही एकत्र करून त्यात थोडं पाणी घालून मध्यम स्वरूपाचे मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटं झाकून ठेवा. ज्यामुळे रवा नीट फुलतो. दरम्यान तुम्ही यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, किसलेलं गाजर आणि हिरवी मिरची घालू शकता. भाज्यांमुळे अप्पे केवळ चविष्टच होत नाही तर ते अधिक पौष्टिकही होतात. 

अधिक चव येण्यासाठी जीरं, कढीपत्ता, मोहोरीची फोडणी या मिश्रणात घाला. सर्वात शेवटी अप्पे मऊ आणि जाळीदार होण्यासाठी त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा इनो फ्रुट सॉल्ट घालून हलक्या हातानं मिसळून घ्या. आता अप्पे पात्र गरम करून त्याला थोडं तेल लावा आणि तयार मिश्रण प्रत्येक कप्प्यात ओता. 

मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत अप्पे भाजून घ्या. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे अप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा पुदीना चटणीसोबत अप्रतिम लागतात. कमी तेलात तयार होणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. 

अप्पे परफेक्ट होण्यासाठी टिप्स

अप्पे चवीला छान होतातच पण ते दिसायला गोल गरगरीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून कापसासारखे मऊ होण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. अप्प्याचे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे. पीठ जर जास्त घट्ट झाले तर आप्पे आतून कडक होतात. आणि जर पातळ झाले तर ते पात्राला चिकटतात किंवा त्यांचा आकार चपटा होतो. त्यामुळे इडलीच्या पिठाप्रमाणे मध्यम कंसिस्टंसी ठेवा. शक्यतो बारीक रवा वापरावा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तर तो मिक्सरमधून एकदा फिरवून बारीक करून घ्या. यामुळे अप्पे एकजीव होतात आणि विरघळत नाहीत.

Web Title : इंस्टेंट रवा अप्पे रेसिपी: झटपट, आसान और स्वादिष्ट नाश्ता

Web Summary : सूजी, दही और सब्जियों से झटपट रवा अप्पे बनाएं। यह एक त्वरित, स्वस्थ दक्षिण भारतीय नाश्ता है जो मिनटों में तैयार हो जाता है, इसे फर्मेंट करने की आवश्यकता नहीं है। नरम, फूला हुआ बनाने के लिए मसाले और एक चुटकी बेकिंग सोडा डालें। चटनी के साथ आनंद लें!

Web Title : Instant Rava Appe Recipe: Quick, Easy, and Delicious Breakfast Treat

Web Summary : Make instant rava appe with semolina, yogurt, and vegetables. A quick, healthy South Indian breakfast ready in minutes, no fermentation needed. Add spices and a pinch of baking soda for soft, fluffy results. Enjoy with chutney!