Join us

इडलीपात्र न वापरताच झटपट इडल्या करण्याची भन्नाट ट्रिक; ५ मिनिटांत करा गरमागरम इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:03 IST

How to Make Idli Without Idli Maker : तांदूळ भिजवण्याची किचकट प्रोसेस करण्यापेक्षा तुम्ही पटकन रवा, दही असं सहज उपलब्ध होणारं साहित्य वाापरून इडल्या बनवू शकता. 

इडली (Idli) हा घराघरांत खाल्ला जाणारा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्या किंवा जेवणाला कधीही इडली खाण्याची इच्छा होते. (Cooking Hacks) इडली खाण्यासाठी लोक वेगवेगळ्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातात. इडली पांढरीशुभ्र, सॉफ्ट व्हावी यासाठी तुम्ही काही सोपे हॅक्स ट्राय करू शकता. नेहमी नेहमी डाळ-तांदूळ भिजवण्याची किचकट प्रोसेस करण्यापेक्षा तुम्ही पटकन रवा, दही असं सहज उपलब्ध होणारं साहित्य वाापरून इडल्या बनवू शकता. (Idli Recipe)

इडल्या तयार करण्याासाठी इडली पात्राची आवश्यकता असते. पण अनेकांच्या घरी इडली बनवण्याचे भांडे उपलब्ध नसते. अशावेळी घरच्याघरी  इडली पात्राचा वापर न करता सुद्धा तुम्ही इडल्या बनवू शकता. (How To Make Instant Idli) ही रेसेपी ट्राय करण्यासाठी तुम्हाला फक्त ५ ते १० मिनिटं लागतील.

इडली करण्याची सोपी पद्धत (How to Make Idli without Idli Maker)

1) सगळ्यात आधी १ कप रवा, १ कप दही, चवीनुसार मीठ घालून मिश्रण  एकजीव करून घ्या. हे मिश्रण घट्ट करून १ तासासाठी झाकून ठेवून द्या.

2) या कालावधीत इडलीचं पीठ चांगलं फुलून येईल. त्यानंतर इडलीच्या पीठात १ पाऊच इनो घाला.  इनो घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

3) एका ताटाला तेल लावून घ्या. त्यानंतर या इडलीचं तयार बॅटर घाला आणि ताट व्यवस्थित सेट करून घ्या.  दुसरीकडे एका मोठ्या कढईत किंवा परातीत पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यावर इडलीचं बॅटर ठेवा.

4) त्यावर झाकण ठेवा १५ मिनिटं झाकण लावून इडलीचं पीठ शिजवल्यानंतर गॅस बंद करा. सुरीच्या साहाय्याने इडलीचं पीठ तयार झालं आहे की ते तपासून पाहा. नंतर एका ग्लासाने गोल आकाराच्या इडल्या तयार करा.

पोट-मांड्याचा आकार वाढलाय? डॉ. श्रीराम नेने सांगतात 'वेटलॉस'चा खास फॉम्यूला, भराभर वजन घटेल

5) तुम्ही आपल्या आवडीनुसार ग्लास किंवा वाटीने इडल्या तयार करू शकता.  इडलीच्या भांड्यात बनतात तशाच  सॉफ्ट इडल्या तयार झालेल्या असतील. या इडल्या तुम्ही  सांबार किंवा  ओल्या नारळाच्या  हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला झटपट काहीतरी करायचं असेल तर या प्रकाच्या इडल्या उत्तम पर्याय आहेत. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स