आपण कितीही ठरवलं ताजे अन्न खायचे. तरीही काहीना काही उरतेच. जर रात्रीचा भात उरला असेल तर बरेचजण सकाळी फोडणीचा भात करून खातात. तर काहीजण उरलेला भात फेकून देतात. उरलेला भात तुम्ही अनेक प्रकार आहारात समाविष्ट करू शकता. (Easy Way To Make Idli From Leftover Rice)
रात्रीच्या उरलेल्या तांदळापासून इडल्या करणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. इडल्या करण्याची सोपी रेसिपी समजून घेऊ. या इडल्या तुम्ही चटणी, सांबार किंवा भाजीसोबतही खाऊ शकता. (How To Make Idli From Leftover Rice At Home)
उरलेल्या भाताची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य
सकाळच्या नाश्त्यासाठी इडली करण्यासाठी उरलेला भात १ कप, रवा ३ ते ४ कप, दही अर्धा कप, बेकिंग सोडा किंवा इनो अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी हे साहित्य लागेल.
नाश्तासाठी झटपट करा इडल्या
रात्रीच्या उरलेल्या भातापासून तुम्ही झटपट हेल्दी आणि चवदार इडल्या बनवू शकता. यासाठी तुम्हाला फर्मेंटेशनची प्रक्रिया करावी लागणार नाही. भात उरला असेल तर लगेच इडल्या बनवू शकता. सगळ्यात आधी उरलेला भात मिक्सरमध्ये घाला. त्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट जास्त पातळ किंवा जास्त घट्टही असू नये.
या पेस्टमध्ये दही, रवा आणि चवीनुसार मीठ घाला आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. यात तुम्ही थोडं तेलही मिसळू शकता. ज्यामुळे इडली खूपच चवदार होते. हे इडलीचं पीठ तुम्ही जवळपास १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा जेणेकरून इडली व्यवस्थित फुलेल. नंतर यात बेकिंग सोडा किंवा इनो मिसळून बॅटर तयार करा. इडलीच पीठ तयार आहे.
हे पीठ एका मोल्डमध्ये तेल लावून ग्रीस करून घ्या. यात इडलीचं पीठ घालून वाफवण्यासाठी ठेवा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. जेणेकरून इडली आतून व्यवस्थित शिजेल. नंतर १० ते १२ मिनिटांनी तपासून पाहा. इडली व्यवस्थित शिजली असेल तर स्टिमरमधून बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. ही इडली तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणालाही करू शकता.
Web Summary : Don't throw away leftover rice! Make soft, spongy idlis quickly. Grind the rice, mix with semolina, yogurt, and baking soda. Steam in molds for a delicious, instant breakfast with chutney or sambar.
Web Summary : बचे हुए चावल को फेंके नहीं! मुलायम, स्पंजी इडली झटपट बनाएं। चावल को पीसकर, सूजी, दही और बेकिंग सोडा मिलाएं। स्वादिष्ट नाश्ते के लिए मोल्ड में भाप लें, चटनी या सांभर के साथ परोसें।