Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखा चवदार सांबार घरीच करा; सांबार करण्याची खास रेसिपी-आवडीनं खातील सर्व

हॉटेलसारखा चवदार सांबार घरीच करा; सांबार करण्याची खास रेसिपी-आवडीनं खातील सर्व

How to Make Hotel style Sambhar At Home : तुम्ही सांबार  बनवताना आपल्या आवडीच्या भाज्या त्यात घालू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 19:01 IST2025-01-14T18:20:35+5:302025-01-14T19:01:15+5:30

How to Make Hotel style Sambhar At Home : तुम्ही सांबार  बनवताना आपल्या आवडीच्या भाज्या त्यात घालू शकता

How to Make Hotel style Sambhar At Home : How To Make Sambar At Home | हॉटेलसारखा चवदार सांबार घरीच करा; सांबार करण्याची खास रेसिपी-आवडीनं खातील सर्व

हॉटेलसारखा चवदार सांबार घरीच करा; सांबार करण्याची खास रेसिपी-आवडीनं खातील सर्व

सांबार दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक लोकप्रिय, स्वादीष्ट पदार्थ आहेत (Sambar Recipe). यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, भाज्या, मसाल्यांचा वापर केला जातो. सांबार इडली, डोसा, भाताबरोबर खाल्ले जाते. सांबार टेस्टी असण्याबरोबरच हेल्दीसुद्धा असतो. इडली, डोसा याशिवाय अनेत पदार्थांबरोबर सांबार खाल्ले जाते. तुम्ही सांबार  बनवताना आपल्या आवडीच्या भाज्या त्यात घालू शकता. (How To Make Sambar At Home)

सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ, उडीदाची डाळ योग्य प्रमाणात घ्या, यात तुम्ही दुधी, शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो या भाज्या घालू शकता. सांबार मसाला, हळद पावडर, लाल मिरची पावडर, हिंग, कढीपत्ता, चिंचेचा कोळ, मीठ, तेल, पाणी या पदार्थांचा वापर करतात. (How to Make Hotel style Sambhar At Home)

सांबार करण्याची कृती

सर्व डाळी धुवून कुकरमध्ये घाला. त्यात थोडं मीठ आणि पाणी घालून २ ते ३ शिट्ट्या काढून घ्या. दुधी, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात हिंग, कढीपत्ता, जीरं घाला. नंतर यात  चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. कांदा टाकल्यानंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून व्यवस्थित भाजून घ्या.

भाजलेल्या मसाल्यांमध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला घालून व्यवस्थित मिसळा. त्यात चिंचेचा कोळ घालून त्यात थोडं पाणी मिसळून भाज्या घाला. शिजवलेल्या डाळी भाज्यांमध्ये घालून व्यवस्थित मिसळा. गरजेनुसार पाणी सांबार उकळवून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सांबार सर्व्ह करा. 

Web Title: How to Make Hotel style Sambhar At Home : How To Make Sambar At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.