साऊथ इंडियन (South Indian Food) पदार्थांमध्ये इडली डोश्याबरोबरच मेंदू वडा हा आवडीनं खाल्ला जाणारा पदार्थ आहे. मेदू वडा बाहेर मिळतो तसा कुरकुरीत, परफेक्ट होत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. काहीजणांना मेदू वड्याला योग्य आकारही देता येत नाही (Cooking Hacks). काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. हॉटेलमध्ये मिळतो तसा परफेक्ट मेदू वडा करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. गोल गरगरीत, कुरकुरीत मेदू वडा करण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (How To Make Medu Vada)
मेदू वडा करण्याची सोपी रेसिपी (How To Make Medu Vada)
उडीद डाळ ४ ते ६ तास किंवा रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. डाळ चांगली भिजल्यावर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका. भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात टाका. पीठ एकदम मऊ पेस्ट होईपर्यंत वाटा. वाटताना पाण्याचा वापर शक्यतो टाळा, आणि जर गरज पडलीच तर फक्त एक-दोन चमचे पाणी वापरा, जेणेकरून पीठ घट्ट राहील. वाटलेले पीठ एका मोठ्या भांड्यात काढा आणि ते ५-७ मिनिटे एकाच दिशेने चांगले फेटा. यामुळे पीठात हवा शिरते आणि वडे मऊ होतात.
फेटलेल्या पिठामध्ये मीठ, जिरं, काळे मिरे, आले, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून चांगले मिसळा. एका कढईत तेल चांगले गरम करा. वडा तळण्यापूर्वी आपले हात पाण्याने ओले करा. हातावर पिठाचा एक छोटा गोळा घ्या, त्याला गोलाकार आकार द्या. आता अंगठ्याने किंवा बोटाने त्या गोळ्याच्या मध्यभागी एक छोटे छिद्र करा.
हा तयार झालेला वडा हळूच गरम तेलात सोडा. गॅसची आंच मध्यम ठेवा. वडे दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेले वडे तेल निथळण्यासाठी टिशू पेपरवर काढा. तुमचे गरमागरम मेदू वडे सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहेत.
मेदू वडे बिघडू नयेत म्हणून टिप्स
१) डाळ वाटताना शक्य असल्यास पाणी अजिबात वापरू नका. जर गरज पडली तर फक्त १ ते २ चमचे थंड पाणी वापरा.
२) पीठ नेहमी जाडसर आणि घट्ट ठेवा. पीठ पातळ झाल्यास वडे तेल पितात आणि तळताना त्यांचा आकार बिघडतो.
३) डाळ वाटून झाल्यावर पीठाला एकाच दिशेनं ५ ते ७ मिनिटं चांगलं फेटा. हे केल्यानं पिठात हवा शिरते आणि वडे तळल्यावर आतून हलके आणि मऊ होतात.
