Join us

शेवग्याच्या पानांचं थालीपीठ! भरपूर पोषण आणि चमचमीत पदार्थ-खमंग-खुसशीत मेजवानीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:13 IST

Moringa Leaves thalipeeth : जर आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी खायची नसेल तर यापासून टेस्टी थालीपीठही करू शकता.

Moringa Leaves thalipeeth : प्रोटीन, कॅल्शिअम आणि आयर्न मिळवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याची पानं खूप फायदेशीर मानली जातात. शेवग्याच्या पानांची भाजी नेहमीच खाण्याचा सल्लाही एक्सपर्ट देत असतात. कारण यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. जर आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी खायची नसेल तर यापासून टेस्टी थालीपीठही करू शकता. शेवग्याच्या पानांचं थालीपीठ खोबऱ्याची चटणी किंवा गुळासोबत टेस्टी लागतं. 

काय लागेल साहित्य?

हे खास आणि वेगळे थालीपीठ तयार करण्यासाठी दीड कप फ्रेश शेवग्याची पानं, दीड कप रागीचं पीठ, एक मोठा चमचा तिळाचं तेल, एक छोटा चमचा राई,  एक छोटा चमचा धुतलेली उडीद डाळ, एक छोटा चमचा चणा डाळ, दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा भाजलेले तीळ, मीठ, वाळेलली एक मिरची, एक बारीक कापलेला कांदा.

कसं बनवाल?

सगळ्यात आधी तडका तयार करा. यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये तिळाचं तेल गरम करून त्यात राई, उडीद डाळ आणि चण्याची डाळ लाइट गोल्डन होईपर्यंत भाजा. नंतर गॅस बंद करा. नंतर एका वाट्यामध्ये रागीचं पीठ, हिरव्या मिरच्या, पांढरे तीळ, मीठ, वाळलेली मिरची, कापलेला कांदा आणि शेवग्याची पानं टाका. यात वरून तडका टाकून चांगलं मिक्स करून घ्या.

थालीपीठाची रेसिपी

आता जवळपास अर्धा कप कोमट पाण्यानं पीठ चांगलं मळून घ्या. पीठ जास्त आसटही होऊ नये. मुलायम व्हायला हवं. गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवा. हात ओले करा आणि पीठाचा एक गोळा घेऊन तव्या एक एक कोपरा दाबत एका पातळ टिक्कीसारखा शेप द्या. आता या टिक्कीमध्ये छोटी छोटी छिद्र करा. वरून चारही बाजूने थोडं तेल टाका.

पातळ टिक्की कमी आसेवर जवळपास २ मिनिटं पाचवा. टिक्की दुसऱ्या बाजूनेही चांगली पाचवा. ही प्रोसेस फॉलो करून बाकीचे थालीपीठही बनवा. हे थालीपीठ खोबऱ्याची चटणी किंवा गुळासोबत टेस्टी लागतात. दही किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सकिचन टिप्स