lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > विकतच्या हळदीपेक्षाही जास्त सुगंधी आणि शुद्ध हळद घरी तयार करा- एकदम सोपी रेसिपी 

विकतच्या हळदीपेक्षाही जास्त सुगंधी आणि शुद्ध हळद घरी तयार करा- एकदम सोपी रेसिपी 

How To Make Haldi Powder At Home: घरच्याघरी हळद पावडर (turmeric powder) तयार करण्याची ही सोपी रेसिपी पाहा.. या रेसिपीनुसार केलेली हळद ६ महिने चांगली टिकेल. (Halad tayar karnyachi recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2024 12:03 PM2024-01-11T12:03:27+5:302024-01-11T15:17:09+5:30

How To Make Haldi Powder At Home: घरच्याघरी हळद पावडर (turmeric powder) तयार करण्याची ही सोपी रेसिपी पाहा.. या रेसिपीनुसार केलेली हळद ६ महिने चांगली टिकेल. (Halad tayar karnyachi recipe)

How to make haldi powder at home? Easy and simple recipe of making haldi powder at home, haldi powder making recipe in marathi | विकतच्या हळदीपेक्षाही जास्त सुगंधी आणि शुद्ध हळद घरी तयार करा- एकदम सोपी रेसिपी 

विकतच्या हळदीपेक्षाही जास्त सुगंधी आणि शुद्ध हळद घरी तयार करा- एकदम सोपी रेसिपी 

Highlightsतयार केलेली हळदीची पावडर स्वच्छ कोरड्या बाटलीत भरून ठेवा. ६ महिन्यांपर्यंत चांगली टिकेल. या हळदीला फक्त ओलसर हात लागू देऊ नये. 

बाजारात गेलं की स्वयंपाक घरातले जवळपास सगळेच पदार्थ विकत मिळतात. अगदी चटणी- लोणच्यापासून ते पुरणपोळीपर्यंत सगळंच विकत मिळतं. ते पदार्थ कितीही चवदार असले तरी पण घरच्या अन्नाची सर काही त्या पदार्थांना नसते. म्हणूनच तर अनेक घरांमधल्या वयस्कर महिला अजूनही लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, कांदा- लसूण मसाला असं सगळं घरीच तयार करतात. घरी तयार केलेले मसाले घातलेल्या भाज्या तर आणखी चवदार होतात. आता या घरच्या मसाल्यांना घरी तयार केलेल्या हळदीची जोड द्या (Easy and simple recipe of making haldi or turmeric powder at home)आणि तुमच्या घरच्या पदार्थांची चव अजून खुलवा.. (How to make haldi powder at home?) घरच्याघरी हळदीची पावडर तयार करणं अगदी सोपं आहे. बघा हळद पावडर तयार करण्याची ही एक खास रेसिपी. (haldi powder making recipe in marathi)

 

घरी हळद पावडर तयार करण्याची रेसिपी

घरच्याघरी हळद पावडर कशी तयार करायची, याविषयीचा एक व्हिडिओ ghoomti_firti_foodie या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

व्यायामानंतर खूप थकता? अंशुका परवानी सांगतात बदामासोबत 'हा' पदार्थ खा- दिवसभर ॲक्टीव्ह राहाल 

हळद पावडर तयार करणं अगदी सोपं आहे. शिवाय त्यासाठी आपल्याला खूप काही वेळ देण्याची किंवा हळद तयार करण्यासाठी खूप मेहनत घेण्याचीही गरज नाही.

संक्रांतीला जावयासाठी निवडा हलव्याचे सुंदर दागिने- लेकीसह जावयाचंही कौतुक- पहिला संक्रांतसण होईल स्पेशल

घरी हळद तयार करायची असेल तर सगळ्यात आधी बाजारात जाऊन ओली हळद विकत आणा. विकत आणलेली हळद स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एका पातेल्यात गरम पाणी करा आणि त्यात ओली हळद अर्धा तास भिजत ठेवा. 

 

त्यानंतर हळद पाण्यातून काढून घ्या. स्वच्छ कपड्याने चांगली पुसून घ्या आणि हळदीची सालं काढून टाका.

यानंतर हळद किसून घ्या आणि उन्हामध्ये २ ते ३ दिवस वाळायला ठेवा.

फक्त २ पदार्थ वापरा- गॅस शेगडीपासून ते तेलकट झालेल्या टाईल्सपर्यंत सगळं स्वयंपाकघरच होईल चकाचक

हळद चांगली वाळल्यानंतर, तिच्यातला ओलावा पुर्णपणे गेल्यानंतर ती हळद मिक्सरमधून वाटून तिची पावडर करून घ्या. 

तयार केलेली हळदीची पावडर स्वच्छ कोरड्या बाटलीत भरून ठेवा. ६ महिन्यांपर्यंत चांगली टिकेल. या हळदीला फक्त ओलसर हात लागू देऊ नये. 

 

Web Title: How to make haldi powder at home? Easy and simple recipe of making haldi powder at home, haldi powder making recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.