सध्या हिवाळा असल्याने बाजारात पेरू भरपूर पेरू येत आहेत. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पेरू खूप उपयुक्त ठरतो. यासोबतच पोट साफ होण्यासाठीही पेरूची मदत होतेच. आता नुसता पेरू तर आपण नेहमीच खातो. काही ठिकाणी पेरूची भाजीही केली जाते. आता मात्र पेरुची चटपटीत चटणी करून पाहा. ही चटणी करायला अगदी सोपी असून १० मिनिटांचा वेळ त्यासाठी पुरेसा आहे (how to make green chutney of guava?). शिवाय ही चटणी जर जेवणात असेल तर तुम्हाला इतर कोणती दुसरी भाजी करण्याचीही गरज नाही.(peru chi chutney recipe)
पेरूची चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराचा पेरू
३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि १ इंच आल्याचा तुकडा
२ टेबलस्पून गूळ आणि एका लिंबाचा रस
Skin Care: घरीच तयार करा ३ प्रकारचे टोनर, फक्त १० रुपयांत चेहऱ्यावर येईल लाखमोलाचा ग्लो
धनेपूड आणि जिरेपूड प्रत्येकी एकेक चमचा
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून चाट मसाला
चवीनुसार मीठ
कृती
पेरूची चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी पेरू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे ४ भाग करा आणि ज्या भागात जास्त बिया असतात तो भाग काढून टाका.
पायाचे घोटे, हात, मान काळी पडली? कॉफी घेऊन घरीच 'हे' क्रिम बनवा, टॅनिंग जाऊन त्वचा स्वच्छ
आता पेरूचे बारीक बारीक तुकडे करा. मिरच्याही चिरून घ्या. पेरुचे तुकडे, मिरच्या, आलं, कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्या.
यानंतर ती पेस्ट एका वाटीत काढून घ्या. त्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, गूळ, लिंबाचा रस, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. चटपटीत पेरूची चटणी तयार... ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी, पराठा, डोसा अशा पदार्थांसोबत खाऊ शकता.
