बाजारात साजूक तूप अगदी सहज विकत मिळतं. साजूक तूप विकत घेण्यापेक्षा, आजही अनेक घरांमध्ये घरच्याघरीच पारंपरिक पद्धतीने साजूक तूप (make ghee quickly at home with Mixer Grinder) तयार केले जाते. घरी तयार केलेल्या साजूक तुपाची सर कोणत्याही विकतच्या महागड्या तुपाला नसतेच. परंतु घरीच साजूक तूप तयार करायचं म्हटलं तर फारच किचकट (how to make ghee in mixer grinder) आणि वेळखाऊ कामं वाटतं. साजूक तूप तयार करण्याची पारंपरिक पद्धत ही खूप मोठी (make ghee from malai in mixer) असल्याने अनेक गृहिणी तूप घरीच तयार करण्याचा कंटाळा करतात. साठवलेल्या सायीचे तूप तयार करताना या सगळ्या प्रक्रियेत थोडी जरी चूक झाली तर साजूक तूप बिघडू शकते किंवा खराब होऊ शकते(homemade ghee in mixer grinder).
खरंतर, साजूक तूप तयार करणे हे कोणत्याही कलेपेक्षा कमी नाही. घरच्याघरीच साजूक तूप काढताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. याचबरोबर, साठवलेल्या सायीचे तूप काढताना योग्य पद्धत फॉलो केली तर साजूक तूप काढणे अगदी सोपे काम वाटेल. साठवलेल्या सायीचे तूप तयार करताना सर्वात आधी साठवलेली साय व्यवस्थित चमच्याने फेटून त्यातील गुठळ्या काढाव्या लागतात. इतकंच नाही तर साय गरम करुन घेताना ती करपू नये म्हणून सतत चमच्याने हलवत रहावी लागते. सायीत गुठळ्या व्यवस्थित मोडल्या नाही किंवा ती नीट गरम करून घेतली नाही तर तूप खराब होते किंवा फसते. यासाठीच साठवलेल्या सायीचे साजूक तूप करताना फारसा वेळ खर्च होऊ नये, यासाठी मिक्सरच्या मदतीने झटपट साजूक तूप तयार करण्याची नवीन पद्धत पाहूयात...
मिक्सरच्या मदतीने साजूक तूप झटपट कसे तयार करावे ?
१. सर्वातआधी २० ते २५ दिवस साठवून ठेवलेली साय फ्रिजमधून बाहेर काढून ती नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यावी.
२. आता ही साठ्वलेली साय एका मिक्सरच्या भांड्यात ओतून सोबत थोडे थंड पाणी देखील घालावे. मग साठवलेली साय आणि थंड पाणी यांचे एकत्रित मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यावे. (यामुळे सायीतील गुठळ्या मोडल्या जातात.)
गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ६ टिप्स- मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...
फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? ६ टिप्स, एका मिनिटात बर्फ वितळून फ्रिज होईल स्वच्छ...
३. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यावर या सायीचे लोणी तयार होईल. ते लोणी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. लोण्याचा गोळा तयार करून ३ ते ४ वेळा तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
४. स्वच्छ धुवून घेतलेल्या लोण्याचे छोटे छोटे गोळे तयार करून ते एका पातेल्यात काढून घ्या. पातेलं गॅसच्या मंद आचेवर ठेवून लोण्याचा गोळा व्यवस्थित शिजवून घ्यावा.
खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...
५. साजूक तूप रवाळ, दाणेदार होण्यासाठी त्यात थोडे चवीनुसार मीठ घाला. मग चमच्याने साजूक तूप व्यवस्थित हलवून घ्यावे. तयार साजूक तूप थोडे थंड झाल्यावर गाळून काचेच्या बरणीत भरून स्टोअर करावे.
फारशी मेहेनत न घेता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरगुती, रवाळ, दाणेदार साजूक तूप तयार आहे.