Join us

साजूक तूप करण्याची पाहा नवी पद्धत, घरचे तूप होईल झटपट आणि छान रवाळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 14:57 IST

How To Make Ghee From Malai At Home : How to make Desi Ghee from Malai : How to make Ghee directly from Malai with in 20mins : How To Make Ghee From Malai In 4 Easy Steps : साजूक तूप तयार करण्यासाठी फॉलो करा फक्त ४ स्टेप्स, दाणेदार, रवाळ तूप होईल झटपट...

आपल्यापैकी बरेचजण रोजच्या जेवणात (How To Make Ghee From Malai At Home) साजूक तूप आवर्जून चमचाभर तरी खातात. साजूक तूप योग्य प्रमाणांत खाल्ल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काही घरांमध्ये साजूक तूप अजूनही पारंपरिक पद्धतीने ( How to make Desi Ghee from Malai) तयार केले जाते, तर काहींच्याकडे (How to make Ghee directly from Malai with in 20mins) बाहेरुन विकत आणले जाते. शक्यतो, काहीवेळा तुपात भेसळ असल्याने आपण तूप घरीच तयार करणे पसंत करतो. साजूक तूप घरच्याघरीच तयार करणे म्हणजे थोडे किचकट आणि वेळखाऊ काम असते( How To Make Ghee From Malai In 4 Easy Steps).

साठवलेल्या सायीचे तूप तयार करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतु या सगळ्यांत थोडी जरी चूक झाली तर साजूक तूप बिघडते. यासाठी घरच्याघरीच साजूक तूप काढताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. याचबरोबर,साठवलेल्या सायीचे तूप काढण्याची योग्य पद्धती फॉलो केली तर चुका न होता, अगदी परफेक्ट, रवाळ आणि दाणेदार साजूक तूप तयार करणे म्हणजे अगदी सोपे काम वाटेल. सायीचे तूप तयार करण्यासाठी फारसा वेळ खर्च होऊ नये, यासाठी नेमकं कोणत्या पद्धतीने साजूक तूप तयार करावं ते पाहा. 

साजूक तूप तयार करण्यासाठी फारसा वेळ लागतो? मग लक्षात ठेवा ही सोपी पद्धत...   

१. साय :- साजूक तूप तयार करण्यासाठी साय परफेक्ट असणे गरजेचे असते. साजूक तूप तयार करण्यासाठी साय साठवताना ती नेहमी स्टील किंवा काचेच्या डब्यांतच साठवावी. याचबरोबर, साजूक तूप काढण्यासाठी ६ ते ८ दिवस पूर्वीची साठवलेली सायचं वापरावी, त्यापेक्षा फार जुनी साय वापरु नये. फार जुनी साय वापरल्याने तूप बिघडू शकते. तूप तयार करण्यापूर्वी सायीतील गुठळ्या चमच्याने मोडून घ्याव्यात तसेच साय चमच्याने चांगली हलवून घ्यावी. रोज साय साठवताना गुठळ्या फोडून साय कालवून ठेवल्याने आयत्यावेळी तूप तयार करताना साय कालवण्यात वेळ जात नाही. 

फक्त १० मिनिटांत करा आंब्याचा मऊ - लुसलुशीत शिरा, एकदा कराल टेस्ट तर म्हणाल बेस्ट...

२. दही तयार करण्याची ट्रिक वापरा :- साठवलेल्या सायीचे साजूक तूप तयार करण्यासाठी, दही करतो त्याच ट्रिकचा वापर करावा. ५ ते ६ दिवस साठवलेली साय एक मोठ्या भांड्यात काढून त्याच्या गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यानंतर मध्यम आचेवर ही साय गरम करून घ्यावी. साय गरम करताना ही सारखी चमच्याने हलवत राहावी. साय व्यवस्थित गरम झाल्यावर बंद गॅस बंद करून साय थोडी थंड होऊ द्यावी. साय कोमट गरम असताना त्यात दही करताना जसे विरजण लावतो तसेच ताकाचे विरजण लावून घ्यावे. कोमट गरम सायीत २ ते ३ टेबलस्पून ताक घालावे. मग व्यवस्थित चमच्याने हलवून हे भांड झाकून एखाद्या गरम उबदार ठिकाणी ठेवू शकता. उन्हाळ्यात शक्यतो फ्रिजमध्येच ठेवा. ७ ते ९ तासानंतर आपण पाहू शकता की साय दह्याप्रमाणेच अगदी जाडसर, घट्ट झाली असेल. 

हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...

३. बर्फ किंवा पाणी वापरा :- आता ही साय जमून अगदी घट्ट झालेली असताना यात थोडे पाणी किंवा बर्फाचे ३ ते ४ खडे घालावेत. त्यानंतर रवीच्या मदतीने हे सगळे मिश्रण घुसळून घ्यावे. मिश्रण घुसळत असतानाच लोणी आणि ताक वेगळं होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर एक दुसऱ्या भांड्यात ताक गाळून लोणी वेगळ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. 

४. मध्यम आचेवर उकळा :- आता बाऊलमध्ये काढून घेतलेले लोणी एका भांड्यात घेऊन गॅसच्या मध्यम आचेवर व्यवस्थित उकळवून घ्या. हे मिश्रण उकळवताना सारखे चमच्याने हलवत राहावे. मिश्रण चांगले उकळवून घेतल्यानंतर एक काचेच्या बरणीत गाळून व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे. 

कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!

अशाप्रकारे तुम्ही फारशी मेहनत न घेता अगदी सोप्या पद्धतीने झटपट साठवलेल्या सायीचे तूप काढू शकता. या पद्धतीने साजूक तूप काढल्याने तुम्हाला फारसा वेळ न लागता अगदी १० ते १५ मिनिटांत तूप तयार करता येऊ शकते.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स