हिवाळ्यात बाजारांत लालचुटुक, रसरशीत अशी गाजर मोठ्या प्रमाणात विकायला ठेवलेली असतात. गाजराचा हलवा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा खास गोड पदार्थ... पण क्वचितच कुणी असेल ज्यांना गाजराचा हलवा आवडत नसेल. लालचुटुक गाजराचा गोड हलवा खाण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही. गाजराचा हलवा खायला चविष्ट शिवाय करायला अतिशय सोपा, कुणाला गरम हलवा खायला आवडतो, तर कुणाला थंड झाल्यावर त्याचा आस्वाद घ्यायला आवडतो. गाजर हलवा खाण्याची पद्धत कशी का असेना, पण आवडतो मात्र सगळ्यांनाच...(Instant carrot halwa recipe).
गाजर हलवा तयार करुन झाल्यानंतर तो खायला सगळ्यांनाच आवडतो. असे असले तरीही तो तयार करताना गाजर किसणे फार कंटाळवाणे आणि किचकट काम वाटते तेव्हा मात्र फार कंटाळा येतो. गाजर हलवा बनवताना गाजर किसताना हात दुखून येतो. एवढेच नाही तर गाजर हलवा काहीवेळा थोडा पचपचीत होतो. रोजची बाकीची कामे सांभाळून तासंतास गाजर किसणे खूपच त्रासदायक वाटते. अशावेळी हवा तसा मनासारखा गाजर हलवा तयार झाला नाही तर हिरमोड होतो. अशावेळी एक सोपी ट्रिक वापरून आपण गाजर न किसता झटपट कुकरमध्ये तयार होणारा गाजराचा परफेक्ट हलवा बनवू शकतो. गाजर न किसताच, थेट प्रेशर कुकरमध्ये गाजराचा हलवा बनवू शकता. तुमचा वेळ वाचवणारी ही पद्धत करायला खूप सोपी आहे आणि विशेष म्हणजे, कुकरमध्ये बनवलेल्या हलव्याची चव हाताने किसून बनवलेल्या हलव्याइतकीच परफेक्ट लागते. गाजर न किसता अगदी चवीला होणारा चविष्ट गाजर हलवा (how to make gajar halwa in pressure cooker) बनवण्याची सोपी रेसिपी....
साहित्य :-
१. गाजर - दीड किलो २. साजूक तूप - पाव कप ३. दूध - १ लिटर ४. साखर - ३०० ग्रॅम ५. खवा - पाव किलो (किसून घेतलेला) ६. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून ७. काजू व बदामाचे काप - प्रत्येकी १/२ कप
कृती :-
१. सर्वप्रथम लालचुटुक गाजर स्वच्छ धुवून त्यांची साल काढून घ्यावी. २. साल काढल्यानंतर या गाजराचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. ३. आता एका कुकरमध्ये साजूक तूप घालून त्यात हे गाजराचे तुकडे घालून घ्यावेत. साजूक तुपावर हे तुकडे व्यवस्थित शिजवून घ्यावेत. ४. कुकरचे झाकण लावून ३ ते ४ मिनिटे ही गाजर तुपात सुवास येईपर्यंत शिजवून घ्यावीत. ५. गाजर व्यवस्थित शिजून तयार झाल्यानंतर यात अर्धे दूध घालावे.
कुकरमध्ये नारळ ठेवून फक्त ३ शिट्ट्या काढा! नारळ फोडायची मेहनतच विसरा, एका मिनिटांत खोबरं हातात...
६. दूध घातल्यानंतर कुकरचे झाकण लावून याला ३ ते ४ शिट्ट्या काढून घ्याव्यात.७. त्यानंतर कुकरचे झाकण उघडून शिजवून घेतलेले गाजर मॅशरने हलकेच दाबून बारीक करून घ्यावेत. ८. गाजर हलकेच मॅश करून घेतल्यानंतर त्यात गरम करून घेतलेले १ लिटर फुल क्रीम दूध घालावे. ९. आता दूध आणि गाजर चांगले एकजीव होईपर्यंत मोठ्या आचेवर गरम करत ठेवून चमच्याने ढवळत राहावे. १०. त्यानंतर दूध संपूर्ण आटेपर्यंत जोपर्यंत शिजवून घ्यावे.
बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...
११. दूध संपूर्ण आटल्यावर यात साखर व खवा घालून घ्यावा. १२. साखर व खवा संपूर्ण विरघळल्यानंतर यात अर्धा कप गरम तूप घालून घ्यावे. १३. आता यात तळात तळून घेतलेले काजू व बदामाचे काप घालावेत, सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून घ्यावी.
आता गाजर हलवा थंड झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून त्यावर ड्रायफ्रुट्सचे काप घालून रेफ्रिजरेटरमध्ये २ ते ३ तास सेट होण्यासाठी ठेवून द्यावा.
Web Summary : Make delicious carrot halwa quickly in a pressure cooker without grating. This easy recipe saves time and delivers perfect taste. Enjoy this winter favorite with simple steps and readily available ingredients.
Web Summary : बिना घीसे कुकर में स्वादिष्ट गाजर का हलवा झटपट बनाएं। यह आसान रेसिपी समय बचाती है और उत्तम स्वाद देती है। सरल चरणों और आसानी से उपलब्ध सामग्री के साथ इस सर्दी के पसंदीदा का आनंद लें।