Lokmat Sakhi >Food > काेण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? 'हा' पदार्थ घालून करा, तोंडाला येईल मस्त चव

काेण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? 'हा' पदार्थ घालून करा, तोंडाला येईल मस्त चव

Flax Seed Chutney Recipe: अतिशय गुणकारी असणारी जवसाची चटणी खमंग पद्धतीने कशी करायची ते पाहूया..(simple recipe of making javas chutney in Marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 17:45 IST2025-04-08T16:48:46+5:302025-04-08T17:45:44+5:30

Flax Seed Chutney Recipe: अतिशय गुणकारी असणारी जवसाची चटणी खमंग पद्धतीने कशी करायची ते पाहूया..(simple recipe of making javas chutney in Marathi)

how to make flax seed chutney, simple recipe of making javas chutney, flax seed chutney recipe  | काेण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? 'हा' पदार्थ घालून करा, तोंडाला येईल मस्त चव

काेण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? 'हा' पदार्थ घालून करा, तोंडाला येईल मस्त चव

Highlightsही चटणी जेव्हा तुम्ही पानात तोंडी लावायला घ्याल तेव्हा त्यामध्ये थोडंसं तेल घालून खा. चटणीची चव आणखी खुलेल. 

पोळी, भाजी, आमटी, भात असे पदार्थ जरी ताटात वाढलेले असले तरी जोपर्यंत त्यांच्या जोडीला चटणी, लोणचं, कोशिंबीर येत नाही तोपर्यंत जेवणाची मजा वाढत नाही. सगळे पदार्थ तोंडी लावत जेवण कसं मस्त होऊन जातं. चटणी, लोणचं, कोशिंबीर यासारख्या पदार्थांमुळे एकवेळ भाजी, वरण किंवा आमटी यांची चव थोडी बिघडलेली असेल तरीही धकून जाते. त्यामुळे हे पदार्थ बहुसंख्य लोकांना रोजच्या जेवणात हवेच असतात. आता बऱ्याच जणांचा भर शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीवर असतो. त्या तुलनेत जवस, कारळं या चटण्या थोड्या कमी केल्या जातात. यामागचं कारण एकच की या चटण्या खमंग होत नाहीत (how to make flax seed chutney?). असाच समज तुमचाही असेल तर एकदा पुढे सांगितलेल्या पद्धतीने जवसाची चटणी करून पाहा (flax seed chutney recipe).. चटणी एवढी चवदार होईल की जेवणालाच छान चव येऊन जाईल..(simple recipe of making javas chutney in Marathi)

 

जवसाची खमंग चटणी करण्याची रेसिपी 

साहित्य

जवस १ वाटी

खोबऱ्याचा किस अर्धी वाटी

१५ ते २० लसूण पाकळ्या

१ टीस्पून जिरे

दिड ते दोन टेबलस्पून लाल तिखट

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी तर गॅसवर कढई ठेवा आणि जवस अगदी मंद आचेवर चांगले खमंग भाजून घ्या. जवस भाजत असताना गॅसची फ्लेम मोठी करून ते झटपट भाजण्याची गडबड अजिबात करू नका. अन्यथा ते जळतात आणि चटणीला करपट वास लागतो.

नातीपासून आजीपर्यंत प्रत्येकीने रोज खावा 'हा' पदार्थ - हार्मोन्सचा त्रास कधीच होणार नाही

यानंतर भाजून घेतलेले जवस एका ताटात काढून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा किस टाकून तो छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्याचवेळी कढईमध्ये जिरे घाला आणि ते ही भाजून घ्या.

 

यानंतर भाजून घेतलेले जवस, खोबरे, जिरे थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात घाला. याचवेळी त्यामध्ये सोललेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि दिड ते दोन टेबलस्पून लाल तिखट घाला. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी- जास्त करू शकता. 

केस वाढणंच बंद झालं? करा 'हा' उपाय, केस वाढतील भराभर- महिनाभरातच दिसेल फरक 

मिक्सरमधून छान बारीक चटणी करून घ्या. ही चटणी जेव्हा तुम्ही पानात तोंडी लावायला घ्याल तेव्हा त्यामध्ये थोडंसं तेल घालून खा. चटणीची चव आणखी खुलेल. 


 

Web Title: how to make flax seed chutney, simple recipe of making javas chutney, flax seed chutney recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.