Join us
Daily Top 2Weekly Top 5

उरलेल्या भाताचा ५ मिनिटांत करा कुरकुरीत डोसा; डोसा-चटणीचा बेत मस्त, भात वाया जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:13 IST

How To Make Dosa From Leftover Rice (How To Make Dosa From Cooked Rice): ही रेसिपी झटपट तयार होईल आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे डोसे आवडतील.

भात (Rice) उरला की बरेचजण फेकून देतात. तर काहीजण फोडणीचा भात करून खातात. फोडणीचा भात नेहमी खायला कंटाळवाणे वाटते अशावेळी तुम्ही उरलेल्या  भाताचा कुरकुरीत असा डोसा सोप्या पद्धतीनं घरीच करू शकता. भाताचा डोसा करण्याची सोपी रेसिपी पाहूया (How To Make Dosa From Leftover Rice). ही रेसिपी झटपट तयार होईल आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे डोसे आवडतील. खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसोबत तुम्ही हा डोसा खाऊ शकता. ( Leftover Rice Dosa Recipe)

उरलेल्या भाताचा डोसा कसा करावा?

सर्वात आधी उरलेला भात, रवा आणि दही मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या. लक्षात ठेवा की मिश्रण जास्त पातळ होऊ नये.  तयार पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यात तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर थोडे पाणी घालून 'डोसा बॅटर'सारखे मध्यम सुटसुटीत करून घ्या.

हे मिश्रण १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे रवा व्यवस्थित फुलेल आणि डोसा छान जाळीदार होईल.आता नॉन-स्टिक तवा गरम करायला ठेवा. तव्याला थोडे तेल लावून पुसून घ्या. तवा मध्यम गरम झाला की त्यावर एक पळी पीठ टाकून गोलाकार पसरवा. डोशाच्या कडेने थोडे तेल सोडा. मध्यम आचेवर डोसा खालच्या बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजू द्या. डोसा कडा सोडू लागला की समजावे तो तयार आहे. हा डोसा एका बाजूनेच भाजला तरी चालतो.

भाताचा डोसा परफेक्ट होण्यासाठी टिप्स

जर तुम्हाला डोसा अधिक तिखट हवा असेल, तर पीठ दळताना त्यात हिरवी मिरची आणि आले किंवा लाल तिखट घालू शकता. हा डोसा नारळाची चटणी किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत अप्रतिम लागतो. मुलांसाठी करत असाल, तर वरून थोडे चीज,बीट किंवा बारीक चिरलेला कांदा-कोथिंबीर घालू शकता. उरलेल्या भाताचा असा वापर केल्यामुळे अन्नाची नासाडीही टाळता येते आणि सकाळच्या घाईत एक पौष्टिक नाश्ताही तयार होतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Make crispy dosa in 5 minutes from leftover rice!

Web Summary : Don't waste leftover rice! Make crispy dosa quickly. Grind rice with semolina, yogurt, rice flour and salt. Let it rest, then cook like regular dosa. Enjoy with chutney or sambar.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स