Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ९० टक्के लोकांना माहिती नसतं कोणत्या तव्यावर डोसा करायचा? ४ स्टेप्स, कुरकुरीत बनेल डोसा

९० टक्के लोकांना माहिती नसतं कोणत्या तव्यावर डोसा करायचा? ४ स्टेप्स, कुरकुरीत बनेल डोसा

How to Make Dosa Batter Non Sticky : तव्यावर डोसा चिकटू नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर परफेक्ट डोसा तयार होईल आणि फक्त २ मिनिटांत डोसा बनून तयार होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:22 IST2025-10-12T13:14:32+5:302025-10-12T13:22:40+5:30

How to Make Dosa Batter Non Sticky : तव्यावर डोसा चिकटू नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर परफेक्ट डोसा तयार होईल आणि फक्त २ मिनिटांत डोसा बनून तयार होईल.

How to Make Dosa Batter Non Sticky : How To Stop Dosa from Sticking What Is the Secret Of Crispy Dosa | ९० टक्के लोकांना माहिती नसतं कोणत्या तव्यावर डोसा करायचा? ४ स्टेप्स, कुरकुरीत बनेल डोसा

९० टक्के लोकांना माहिती नसतं कोणत्या तव्यावर डोसा करायचा? ४ स्टेप्स, कुरकुरीत बनेल डोसा

डोसा (Dosa) करताना अनेकदा तव्याला चिकटतो. तर कधी व्यवस्थित येत नाही. ९० टक्के लोकांना योग्य पद्धतीनं डोसा काढता येत नाही. ज्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाते. नाश्तासुद्धा वेळेत तयार होत नाही. हॉटेलमध्ये मिळतो तसा परफेक्ट डोसा करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तव्यावर डोसा चिकटू नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या तर परफेक्ट डोसा तयार होईल आणि फक्त २ मिनिटांत डोसा बनून तयार होईल. (How to Make Dosa Batter Non Sticky)

सगळ्यात आधी इंस्टंट डोश्याचं मिश्रण तयार करा

एक मोठा बटाटा घेऊन त्याची सालं काढून घ्या. त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ आणि २ चमचे रवा त्यात घाला ज्यामुळे रव्याला कुरकुरीतपणा येतो. अर्धा चमचा जीरं, मीठ, एक तुकडा किसलेलं आलं एक चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, एक चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता, एक चमचा धणे हे साहित्य लागेल. नंतर अर्धा कप पिठाच्या हिशोबात एक ग्लास पाणी घाला. हे मिश्रण पातळ ठेवा. तुम्ही मिश्रण जितकं पातळ ठेवाल तितकाच डोसा क्रिस्पी बनेल आणि तव्यावर सहज पसरवता येईल. (How to Make Dosa Batter Non Sticky)

परफेक्ट डोसा करण्यासाठी तव्याची निवड कशी करावी?

लोक विचार करतात की नॉन स्टिक तवा सगळ्यात उत्तम आहे. पण डोसा करण्यासाठी नॉनस्टिक तव्यापेक्षा दुसरा तवा उत्तम ठरतो. डोश्याचा तवा वापरल्यास डोसा उत्तम येतो आणि खाली चिकटत नाही. डोश्याचा तवा लोखंडाचा असतो एकदा गरम झाल्यानंतर हा तवा समान तापमान मेंटेन करून ठेवातो. ज्यामुळे मिश्रण चिकटत नाही आणि एकसमान होतं.

लोखंडाच्या तव्यावर डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी डोसा गरम करून घ्या. नंतर तवा गरम झाल्यानंतर त्यावर तेल घालून व्यवस्थित कांद्यानं ग्रिस करून घ्या. तेल तव्यावर व्यवस्थित परसवा. तापमान मीडियम ते उच्च असायलं हवं. तवा थंड झाल्यास डोसा चिकटू शकतो.

डोश्याचं पीठ तव्यावर कसं घालावं?

डोश्याचं पीठ योग्यपद्धतीनं तव्यावर घातल्यानंतर डोश्याला कुरकुरीतपणा येतो. पातळ पीठ असल्यास सहज पसरतं. डोसा मध्यम आचेवर शेकून घ्या. जेव्हा व्यवस्थित शेकला जाईल तेव्हा त्यावर थोडं तेल घाला आणि पलटल्यानंतर दुसऱ्या बाजूनंही व्यवस्थित शेकून घ्या.

बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई घरीच करा; ५ टिप्स, तोंडात टाकताच विरघळेल

क्रिस्पी कुरकुरीत डोसा कसा करावा?

पातळ मिश्रण आणि डोश्याचा योग्य तवा यामुळे डोसा कुरकुरीत होतो. पातळ पीठ असेल तर तव्यावर व्यवस्थित चिकटतं. काही तव्यांवर व्यवस्थित चिकटत नाही ज्यामुळे डोसा कुरकुरीत होत नाही.

Web Title : घर पर बनाएं क्रिस्पी डोसा: तवा का चुनाव और चार आसान उपाय।

Web Summary : घर पर एकदम क्रिस्पी डोसा बनाएं! लोहे का तवा इस्तेमाल करें, सूजी का पतला घोल बनाएं, और सुनिश्चित करें कि तवा गरम हो और अच्छी तरह से चिकनाई किया गया हो। डोसा को परफेक्शन तक पहुंचाने के लिए इन उपायों का पालन करें।

Web Title : Make crispy dosa at home: Tawa selection and four easy steps.

Web Summary : Achieve a perfect, crispy dosa at home! Use a cast iron tawa, prepare a thin batter with semolina, and ensure the tawa is hot and greased well. Follow these steps for dosa perfection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.