ढोकळा (Dhokla In Cooker) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं पण विकतसारखा ढोकळा प्रत्येकालाच जमतो असं नाही. कुकरमध्ये ढोकळा करणं अगदी सोपं आहे (15 Mins Dhokla Recipe). विकतसारखा मऊ, फुललेला, जाळीदार ढोकळा तुम्ही घरच्याघरी करू शकता. हा ढोकळा करण्यासाठी तुम्हाला फार साहित्य लागणार नाही (Soft, Spongy Dhokla Making In Cooker At Home). कमीत कमी साहित्य वापरून तुम्ही हा इंस्टंट ढोकळा बनवू शकता. हा ढोकळा तयार करण्याची सोपी कृती पाहूया. कुकरमध्ये ढोकळा करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. (How To Make Dhokla In Cooker)
कुकरमध्ये ढोकळा करण्याची सोपी कृती Dhokla Making Steps))
एका मोठ्या कुकरमध्ये तळाला १ ते २ ग्लास पाणी घाला. त्यात एक स्टॅण्ड किंवा लहान वाटी उलटी करून ठेवा. कुकरची शिट्टी आणि रिंग काढून टाका. झाकण ठेवून मध्यम आचेवर पाणी गरम करायला ठेवा. त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ, साखर, लिंबाचा रस, हळद, मीठ एकत्र करा.
या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या होऊ न देता मध्यम आणि पातळ मिश्रण तयार करा. ढोकळ्याचं पीठ इडलीच्या पिठापेक्षा थोडं पातळ असावं. ढोकळा वाफवण्यासाठी कुकरचं भांडं आतून तेलानं ग्रीस करून घ्या.
पुऱ्या तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? ७ टिप्स, मस्त टम्म फुगतील
कुकरमधलं पाणी चांगलं गरम झाल्यानंतर ढोकळा लगेच वाफवायला ठेवा. तेव्हाच बॅटरमध्ये इनो फ्रुट सॉल्ट घाला कुकरचं पाणी व्यवस्थित गरम होईल आणि ढोकळा लगेच वाफवायला तयार असेल. बॅटरमध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालून त्यावर १ चमचा पाणी घाला.
इनो घातल्यानंतर बॅटर एकाच दिशेनं वेगानं १५ ते २० सेकंद फेटून घ्या. त्यानंतर बॅटर दुप्पट फुगेल आणि हलकं होईल. इनो घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही अन्यथा ढोकळा नीट फुगत नाही.
तयार पीठ लगेच तेलानं ग्रीस केलेल्या भांड्यात ओला. ट्रे लगेच कुकरमधील स्टँडवर ठेवा आणि कुकरचं झाकण लावून ठेवा. ढोकळा मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटं वाफवा. १५ मिनिटं झाकण ठेवून त्यात सुरी किंवा टुथपिक घालून तपासा. सुरी स्वच्छ बाहेर आल्यास ढोकळा शिजला आहे की नाही ते पाहा. जर सुरीला बॅटर चिकटलं तर ५ मिनिटं अजून वाफवा. थंड झाल्यावर सुरीच्या मदतीनं कडा सैल करून घ्या ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करा.
फोडणीसाठी काय तयारी करावी? (How To Make Tadka For Dhokla)
एका भांड्यात दीड वाटी पाणी आणि २ चमचे साखर, चिमूटभर मीठ घालून गरम करून घ्या. साखर विरघळली की गॅस बंद करा आणि बाजूला ठेवा. हे पाणी ढोकळ्यावर घातल्यानं ढोकळा मऊ आणि ओलसर होतो.
एका लहान कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यावर मोहोरी घाला. मोहोरी तडतडल्यानंतर त्यात हिरवी मिरची घाला आणि कढीपत्ता सुद्धा घाला. १० सेकंद परतवून घ्या नंतर लगेच गॅस बंद करा.
केसांचं शेपूट झालंय-खूप गळतात? १ आयुर्वेदीक घरगुती उपाय करा, लांबसडक-दाट होतील केस
तयार केलेली फोडणी साखरेच्या पाण्यामध्ये घालून मिक्स करा. ही कोमट फोडणी ढोकळ्याच्या कापलेल्या तुकड्यांवर समान प्रमाणात घाला. सजावटीसाटी कोथिंबीर आणि ओलं नारळं किसून घालू शकता.