'ढोकळा' हा हलका, स्वादिष्ट आणि पौष्टिक गुजराथी पदार्थ आहे, जो परफेक्ट प्रमाणात फुललेला आणि मऊ, स्पॉंजी झाला तरच खायला आणि चवीला अप्रतिम लागतो. ढोकळा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच! मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार करणं म्हणजे अनेकांना कठीण काम वाटतं. परफेक्ट मऊ आणि स्पॉंजी ढोकळा तयार करण्यासाठी त्याचं बॅटर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तयार होणं खूप महत्त्वाचं असतं. पारंपारिक पद्धतीने ढोकळ्याचे बॅटर तयार करण्यासाठी डाळी आणि पीठ भिजवून, वाटून आणि आंबवून बराच वेळ द्यावा लागतो. अनेकदा या प्रक्रियेत गडबड झाल्यास ढोकळा हवा तसा फुलत नाही किंवा त्याला जाळी पडत नाही. पण, आता परफेक्ट ढोकळा तयार करण्यासाठी तासंतास वाट पाहण्याची गरज नाही(How to make dhokla batter in mixer grinder).
आपण स्वयंपाकघरातील साध्या मिक्सर ग्राइंडरचा वापर करून अगदी झटपट आणि अचूकपणे मऊ, स्पंजी आणि जाळीदार ढोकळ्याचे बॅटर घरच्याघरीच तयार करू शकतो. मिक्सरमध्ये झटपट आणि परफेक्ट ढोकळ्याचे बॅटर कसे तयार करावे, ज्यामुळे वेळही वाचेल आणि ढोकळाही होईल अगदी हॉटेलसारखा स्पॉंजी आणि चविष्ट याची इन्स्टंट ट्रिक पाहूयात. इनो किंवा बेकिंग सोडा न वापरताही ढोकळा फुलवण्याची आणि तो परफेक्ट करण्याची ही खास 'मिक्सर ट्रिक' सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. या सोप्या पद्धतीने (dhokla batter recipe in mixer) मिक्सरमध्ये ढोकळ्याचे बॅटर कसे तयार करायचे ते पाहा...
साहित्य :-
१. बेसन - १ कप
२. रवा - १/२ कप
३. साखर - २ टेबलस्पून
४. हिंग - चिमूटभर
५. मीठ - चवीनुसार
६. हळद - १/२ टेबलस्पून
७. लिंबूसत्व - १/२ टेबलस्पून
८. दही - १/४ कप
९. तेल - ३ टेबलस्पून
१०. पाणी - १ + १/२ कप
११. बेकींग सोडा - १/२ टेबलस्पून
१२. मोहरी - १ टेबलस्पून
१३.हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या
१४. कडीपत्ता - १० ते १२ पाने
ना तांदूळ, ना तेल करा मऊ - लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! चवीला उत्तम आणि पौष्टिक - नाश्ता होईल पोटभर...
सकाळच्या गार चपात्या कुकरमध्ये एका मिनिटांत करा गरम, पाहा इस्टंट ट्रिक-रोज खा गरमागरम चपात्या...
कृती :-
१. एका मिक्सरच्या भांड्यात बेसन, रवा, साखर, हिंग, चवीनुसार मीठ, हळद, लिंबूसत्व, दही, तेल, पाणी घाला.
२. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये एकत्रित करून चमच्याने कालवून घ्या. त्यानंतर, मिक्सरचे झाकण लावून मिक्सर मध्ये बॅटर फिरवून घ्यावे.
३. मिक्सरमध्ये बॅटर फिरवून घेतल्यानंतर तयार बॅटरमध्ये बेकिंग सोडा घालूंन मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
महिनाभर टिकणारी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी ८ टिप्स, टिकते छान-विकत आणायची गरजच नाही...
४. आता एका मोठ्या भांड्यात तयार ढोकळ्याचे बॅटर ओतून घ्यावे. एका मोठ्या पसरट कढईत पाणी ठेवून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. कढईत स्टॅन्ड ठेवून त्यावर हे भांडं ठेवावं वरून झाकण ठेवून २० मिनिटे वाफवून घ्यावे.
५. एका भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, हिंग, कडीपत्ता घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी, मग ही फोडणी तयार ढोकळ्यावर ओतावी.
विकतपेक्षाही मऊ, लुसलुशीत आणि खमंग चवीचा असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी व चिंच - गुळाच्या आंबट - गोड चटणी सोबत ढोकळा खाण्यासाठी सर्व्ह करावा.
