Lokmat Sakhi >Food > Paneer Bhurji : ढाबास्टाईल पनीर भुर्जी करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल चटपटीत पनीर भुर्जी

Paneer Bhurji : ढाबास्टाईल पनीर भुर्जी करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल चटपटीत पनीर भुर्जी

How To Make Dhaba Style Paneer Bhurji : हॉटेलमध्ये  मिळते तशी मसालेदार, चविष्ट पनीर भुर्जी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 19:34 IST2025-09-11T19:10:20+5:302025-09-11T19:34:49+5:30

How To Make Dhaba Style Paneer Bhurji : हॉटेलमध्ये  मिळते तशी मसालेदार, चविष्ट पनीर भुर्जी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया.

How To Make Dhaba Style Paneer Bhurji : Paneer Bhurji Recipe Hotel Style Paneer Bhurji | Paneer Bhurji : ढाबास्टाईल पनीर भुर्जी करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल चटपटीत पनीर भुर्जी

Paneer Bhurji : ढाबास्टाईल पनीर भुर्जी करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल चटपटीत पनीर भुर्जी

शाकाहारी लोकांप्रमाणेच सर्वांनाच पनीर आणि पनीरच्या रेसिपीज खूप आवडतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पनीरचे वेगवेगळे स्टाटरर्स, ग्रेव्हीच्या भाज्यांना नेहमीच पसंती दिली जाते. घरच्याघरीसुद्धा सोप्या पद्धतीनं तुम्ही पनीरच्या रेसिपीज बनवू शकता (Hotel Style Paneer Bhurji). नेहमी नेहमी काय भाजी करावी काही सुचत नाही, डब्ब्यालाही रोज नवीन काय भाज्या द्यायच्या याचं उत्तम मिळत नाही. तर पाहूणे आल्यानंतर ताटात कोणती भाजी वाढावी. याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो. कमी वेळात झटपट, चटपटीत अशी डिश  करायची असेल तर तुम्ही पनीर भुर्जी बनवू शकता. हॉटेलमध्ये  मिळते तशी मसालेदार, चविष्ट पनीर भुर्जी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. (Paneer Bhurji Recipe)

पनीर भुर्जीसाठी लागणारं साहित्य

किसलेलं पनीर: २०० ग्रॅम 

बारीक चिरलेला कांदा: १ मोठा 

बारीक चिरलेला टोमॅटो: १ मोठा 

बारीक चिरलेला हिरवी मिरची: १-२ 

आले-लसूण पेस्ट: १ चमचा

धने पूड: १ चमचा

हळद: अर्धा चमचा

लाल तिखट: १ ते दीड चमचा

गरम मसाला: अर्धा चमचा

जिरे: अर्धा चमचा

तेल: २ मोठे चमचे

बटर: १ मोठा चमचा 

मीठ: चवीनुसार

बारीक चिरलेली कोथिंबीर : सजावटीसाठी


पनीर भुर्जी करण्याची सोपी रेसिपी (How To Make Paneer Bhurji)

एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.

चहात आधी काय घालावं-दूध,साखर की चहा पावडर? पाहा टपरीस्टाईल कडक चहा करण्याची पद्धत

आता कढईत आले-लसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परता. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो शिजल्यावर त्यात हळद, लाल तिखट, धने पूड आणि गरम मसाला घालून मसाले चांगले परतून घ्या.

पीठ न आंबवता १० मिनिटांत करा सुपर सॉफ्ट पौष्टीक नाचणीची इडली; सोपी रेसिपी

मसाले परतल्यावर त्यात किसलेले पनीर आणि चवीनुसार मीठ घाला. पनीर भुर्जीला रंग येण्यासाठी थोडं बटर घालू शकता. सर्व मिश्रण हळूवारपणे एकत्र करा. ५-७ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. मध्ये-मध्ये मिश्रण ढवळत राहा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. गरमागरम पनीर भुर्जी चपाती किंवा भाकरीसोबत खायला तयार आहे.

Web Title: How To Make Dhaba Style Paneer Bhurji : Paneer Bhurji Recipe Hotel Style Paneer Bhurji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.