दाल मखनी हा पंजाबचा एक पारंपरिक पदार्थ. पण तो एवढा चवदार असतो की आता अवघ्या भारतातच आवडीने खाल्ला जातो. दाल मखनीच्या नावावरून असं वाटतं की या पदार्थामध्ये भरपूर बटर किंवा तूप घातलं जातं. त्यामुळे पंजाबसोडून इतर भागात जेव्हा तो पदार्थ केला जातो तेव्हा त्यात तूपाचा, बटरचा अक्षरश: मारा केला जाताे. त्यामुळे त्यांची पौष्टिकताही कुठे ना कुठे कमी होते आणि त्यातल्या फॅट्सचं प्रमाण प्रचंड वाढतं. म्हणूनच चुकीच्या पद्धतीने दाल मखनी करण्यापेक्षा तिची मुळ पद्धत जाणून घ्या (how to make dal makhani?). यामुळे चवीमध्ये तर छान बदल होईलच पण ती जास्त पौष्टिकही होईल.(punjabi style dal makhani recipe in Marathi)
दाल मखनी करण्याची पंजाबी पद्धत
साहित्य
अर्धी वाटी काळी उडीद डाळ
पाव वाटी राजमा
१ चमचा तेल आणि तूप
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
किचनमधले ४ पदार्थ एकत्र करून खा! हाडांसाठी मस्त टॉनिक, म्हातारे झालात तरीही हाडं राहतील ठणठणीत
गरम मसाला, लाल तिखट, मीठ चवीनुसार
धनेपूड आणि दालचिनीची पूड १ टीस्पून
२ तेज पान, १ मोठी वेलची
कृती
सगळ्यात आधी उडीद डाळ, राजमा स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये पाणी घालून त्यात ते शिजायला लावा. त्यामध्ये दोन तेजपान, मोठी वेलची, हळद, मीठ घाला. मंद आचेवर ३ ते ४ शिट्टया होईपर्यंत डाळ, राजमा शिजवून घ्या.
त्याच त्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला? मराठवाडी पद्धतीने करा कुरडईची खमंग भाजी, घ्या रेसिपी
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये तूप आणि तेल घाला. तेल तापल्यानंतर हळद, लाल तिखट, गरम मसाला घाला. तेलात थेट मसाले आणि तिखट घातल्याने त्यांचा स्वाद खूप वेगळा आणि जास्त खमंग लागतो. यानंतर त्यात टोमॅटोची अगदी पातळ केलेली प्युरी घाला. तेल सुटेपर्यंत ही प्युरी चांगली परतून घ्या. त्यानंतर त्यात धनेपूड, दालचिनी पूड घाला.
यानंतर यामध्ये शिजवलेली उडीद डाळ आणि राजमा घाला. त्यात पुन्हा चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घाला. गरजेनुसार त्यात गरम पाणी घालून ही डाळ मंद आचेवर अर्धा ते एक तास शिजू द्या.
मुलं तासभरही अभ्यासाला बसत नाहीत? ७ टिप्स- एकाग्रता वाढून भराभर अभ्यास करतील
गॅस मोठा करून भराभर डाळ उकळवून घेऊ नका. कारण ती जेवढ्या मंदपणे शिजत जाईल तेवढाच तिचा स्वाद खुलत राहील. डाळ झाल्यानंतर त्यावरून थोडं बटर किंवा मख्खन घाला. पंजाबी स्टाईलची चमचमीत दाल मखनी तयार..
