वरण भात (Dal Rice) खाल्ल्याशिवाय एकही दिवस जात नाही असे बरेच लोक असतात. वरण करण्यासाठी अनेक घरांमध्ये तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ वापरली जाते (How To Make Dal In Cooker). तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ खाल्ल्यानं फक्त वरणाला चव येत नाही तर आरोग्याच्या दृष्टीनंही हे वरण उत्तम असतं. तुरीच्या डाळीचं वरण करण्याची पद्धत सर्वांनाच माहीत असते (Instant Dal Recipe). आधी डाळ शिजवून घेतली जाते नंतर एका भांड्यात फोडणी देऊन हे त्यात ही शिजवलेली डाळ घोटून घातली जाते. या सगळ्यात खूप वेळही जातो. (Arhar Dal in Cooker Recipe Dal Recipe In Pressure Cooker)
कमीत कमी वेळात स्वादीष्ट वरण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये तुरीच्या डाळीचं वरण करू शकता. या वरणाची चव साध्या वरणापेक्षा दुप्पटीनं चवदार लागेल. साध्या वरणाच्या तुलनेत हे वरण थोडं घट्ट असेल. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. कुकरमध्ये तुरीच्या डाळीचं वरण करण्याची सोपी रेसिपी पाहूया.(Simple Dal Recipe)
कुकरमध्ये १५ मिनिटांत करा विकतसारखा मऊसूत ढोकळा; जाळीदार ढोकळ्याची सोपी रेसिपी
तुरीच्या डाळीचं वरण कुकरमध्ये करण्याची सोपी रेसिपी (Dal Making Tips In Cooker)
आधी तुरीची डाळ व्यवस्थित धुवून घ्या. कुकर गरम करायला ठेवा त्यात तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहोरी घाला. मोहोरी तडतडल्यावर जीरं आणि हिंग घाला. त्यानंतर लगेच लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून लसूण थोडा लालसर होईपर्यंत परतवून घ्या. बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. या फोडणीत स्वच्छ धुतलेली तूर डाळ आणि हळद घाला. डाळ १ मिनिटभर चांगली परतवून घ्या. ज्यामुळे वरण अधिकच चवदार होईल.
डाळ परतवल्यानंतर त्यात ३ ते ४ वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. पाणी व्यवस्थित ढवळून घ्या आणि उकळी येण्याची वाट पाहा. पाण्याला उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोंथिंबीर थोडी घाला. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या करून घ्या. कुकरची हवा आपोआप निघून गेल्यावर झाकण उघडा. झाकण उघडल्यावर डाळ घोटून घ्या.
या पद्धतीनं डाळ व्यवस्थित एकजीव होईल. गरजेनुसार पाणी कमी जास्त घालून वरण पातळ करा. वरून चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम वरण भातासोबत सर्व्ह करा. भातावर वरण घातल्यानंतर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता.
तुपाला इंग्रजीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नसतं तुपाला काय म्हणतात....
वरणाची चव वाढवण्यासाठी काही टिप्स (How To Make Dal At Home)
कुकरमधून डाळ काढल्यानंतर ती रवीनं चांगली घोटून घ्या. कारण डाळीचे दाणे जितके व्यवस्थित मोडले जातील तितकी चांगली चव येईल आणि वरण छान लागेल.
डाळ शिजवताना कुकरमध्ये डाळीसोबत १ चमचा तूप किंवा तेल घाला यामुळे डाळ पटकन शिजते आणि वरणाचा फेसही कमी होतो. फोडणीसाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा ज्यामुळे वरणाला खमंगपणा येईल.
कढीपत्ता आणि हिरवी मिरची फोडणीत चांगली तडतडून घ्या, ज्यामुळे सुगंध वरणात उतरतो.