Join us

दही वडे कडक होतात? सॉफ्ट, हलके दही वडे करण्याची सोपी रेसिपी-तोंडात टाकताच विरघळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 09:47 IST

How to Make Dahi Vada soft : दही वडे बनवण्याची परफेक्ट रेसिपी पाहूया. (How to make dahi vada)

ऑक्टोबर हिटमुळे सर्वचजण घामाने वैतागले आहेत. जास्त घाम येऊ नये यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. या दिवसात दही वडे खाण्याचा आनंद काही वेगळाचं. (Dahi Vada Recipe) घरी बनवलेले दही वडे कडक होतात. (Super Soft Dahi Vada) व्यवस्थित फुलत नाही अशी तक्रार अनेकजण करतात. दही वडे बनवण्याची परफेक्ट रेसिपी पाहूया. (How to make dahi vada)

दही वडा बनवण्याची सोपी रेसिपी (Dahi Vada Easy Recipe)

1) दही वडे बनवण्यासाठी २ कप उडीद डाळ आणि २ कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये  २ ते ३ तासांसाठी भिजवून घ्या. डाळ भिजल्यानंतर पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित दळून घ्या. दळताना जराही पाणी राहणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही जास्त पाणी घातलं तर वड्यांचे टेक्स्चर बिघडू शकते. डाळ जास्त पातळ न करता जाडसर ठेवा. (Super Soft & Juicy Dahi Vada Recipe)

५ मिनिटांत करा खमंग साबुदाणा पराठा-उपवासाची सोपी रेसिपी, साबुदाणा भाजणं-दळण्याची गरजच नाही

2) दही वडा बनवण्याची सगळ्यात महत्वाची स्टेप डाळीची पेस्ट फेटणं ही आहे. दही व्यवस्थित फेटलं गेलं नाहीतर वडे प्लफी बनत नाहीत. उडीदाची आणि मुगाची डाळ चमच्याने मिसळून घ्या. त्यानंतर हाताने एकाच दिशेने फेटून घ्या. त्यानंतर यात मनुके आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. बारीक चिरलेलं आलं घाला.

3) एका दुसऱ्या भांड्यात गरम आणि थंड पाणी घाला. त्यात तूप आणि मीठ घालून थोड्यावेळासाठी तसंच ठेवा. त्यानंतर मध्यम आचेवर दही वडे तळून घ्या. दही वडे तेलात घातल्यानंतर चमचा किंवा झाऱ्याच्या साहाय्याने वरच्या भागावरही तेल घाला. यामुळे दोन्ही बाजूंनी वडे फुलतात. कमी तेलात वडे तळले तर पदार्थ बिघडू शकतो म्हणून तर अर्धे वडे तळल्यानंतर तेल कमी झालं असेल कढईत अजून तेल घाला.

विकतसारखा फुललेला मस्त रवा ढोकळा घरीच करा; रव्यात ‘हा’ पदार्थ घाला, स्पॉन्जी ढोकळा बनेल

४) वडे तळून झाल्यानंतर लगेच पाण्यात घाला. ३० मिनिटांसाठी पाण्यात ठेवल्यानंतर वडे सॉफ्ट होतील.  दह्याचं मिश्रण तयार करण्यासााठी एका भांड्यात दही गाळून घ्या आणि पिठी साखर घालून फेटून घ्या. थोड्यावेळात वडे फुललेले दिसून येतील. त्यानंतर वडे एका बाऊलमध्ये किंवा पसरट ताटात ठेवा. वरून दही घाला त्यानंतर वरून चाट मसाला आणि लाल तिखट घाला. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स