Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी

उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी

How To Make Dahi Pohe: कांदेपोहे तर आपण नेहमीच खातो. पण उन्हाळ्यात मात्र दहीपोहे खायला हवे.. ते कसे करायचे ते पाहा..(summer special dahi pohe recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 16:15 IST2025-04-21T16:14:24+5:302025-04-21T16:15:12+5:30

How To Make Dahi Pohe: कांदेपोहे तर आपण नेहमीच खातो. पण उन्हाळ्यात मात्र दहीपोहे खायला हवे.. ते कसे करायचे ते पाहा..(summer special dahi pohe recipe)

how to make dahi pohe, dahi poha recipe, summer special dahi pohe recipe | उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी

उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी

Highlightsरेसिपी अतिशय सोपी असून खूप पटकन होते. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं...

खमंग कांदे पोहे हा कित्येक लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. गरमागरम कांदेपोहे जर नाश्त्याला आपल्या समोर आले तर क्या बात है.. एरवी कांदे पोह्यांचा आस्वाद तुम्ही भरभरून घ्या. पण उन्हाळ्यात मात्र तुमच्या आवडीच्या पोह्यांना थोडा चटपटीत आणि थंडगार ट्विस्ट द्या.. उन्हाळ्याच्या दिवसांत गरमागरम कांदे पोह्यांएवेजी गार असणारे दही पोहे खावेत. ही एक पारंपरिक रेसिपी असून उन्हाळ्याच्या दिवसांत ती बहुतांश घरांमध्ये हमखास केली जाते (summer special dahi pohe recipe). रेसिपी अतिशय सोपी असून खूप पटकन होते (dahi poha recipe). बघा त्यासाठी नेमकं काय करायचं...(how to make dahi pohe?)

 

दहीपोहे करण्याची रेसिपी

साहित्य 

१ वाटी पोहे

अर्धी वाटी दही

२ हिरव्या मिरच्या

महागड्या रूम फ्रेशनरची गरजच काय! १ रिकामी बाटली घेऊन फक्त १० रुपयांत घर सुगंधित करा..

२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून जिरे

कडिपत्त्याची ६ ते ८ पाने

१ टेबलस्पून शेंगदाणे

१ टेबलस्पून तूप

चिमूटभर हिंग, साखर आणि हळद 

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी तर कांदेपोहे करण्यासाठी आपण जसे पोहे भिजवून घेतो तसे पोहे भिजवून घ्या.

ऊन वाढल्यामुळे माठातलं पाणी थंड होईना? बघा सोपी ट्रिक- फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

यानंतर दही फेटून ते एकसारखं करून घ्या. दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते थोडं पातळ करा. खूप जास्त पातळ दही करू नये. 

आता फेटलेल्या दह्यामध्ये पोहे घाला. त्यात मीठ, साखरही घाला.

 

गॅसवर एक लहान कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तूप घालून जिरे, मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करून घ्या. फोडणी तडतडली की हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि कडिपत्त्याची पानं घाला.

टुथपेस्ट, शाम्पू यासारख्या रोजच्या वापरातल्या ५ वस्तूंमुळे होऊ शकतो कॅन्सर? बघा तज्ज्ञ काय सांगतात...

आता ही तुपाची फोडणी दह्यात भिजवलेल्या पोह्यांवर घालून सगळे पोहे व्यवस्थित हलवून घ्या.

सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून पाेहे सर्व्ह करा. हे पोहे उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. 
 

Web Title: how to make dahi pohe, dahi poha recipe, summer special dahi pohe recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.