Join us

फक्त २ तासांत मलाईदार, घट्ट, गोड दही तयार- बघा दही लावण्याची खास ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 17:36 IST

how to make curd in just 2 hours: दही लावायला कधी विसरला असाल तर झटपट दही लावण्याची ही एक मस्त ट्रिक लक्षात ठेवा.(simple method of making sweet, thick curd at home)

ठळक मुद्देखूप छान मलाईदार दही खायला मिळेल. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे दही, ताक असे पदार्थ रोजच खाल्ले जातात. रोजच्या जेवणात अनेकांना एक वाटी दही किंवा एक ग्लासभर ताक प्यायची सवय असते. आता आपल्याला माहितीच आहे की दही काही लगेच तयार होत नाही. त्यासाठी कमीतकमी ६ ते ७ तास गरजेचे असतात. त्यामुळे अगदी आठवण ठेवून हे काम नेहमी करावं लागतं. एखाद्या दिवशी गडबडीत दही लावायला आपण विसरून जातो. दरवेळी बाहेरून विकतचं दही आणणंही शक्य नसतं. त्यामुळे जर कधी अगदी दोन तीन तासांत दही पाहिजेच.. अशी वेळ तुमच्यावर आली तर ही एक ट्रिक पाहून ठेवा (tips and tricks for making thick curd). कमीतकमी वेळात अगदी घट्ट, मलाईदार आणि मधूर चवीचं दही तयार...(how to make curd in just 2 hours?)

झटपट दही लावण्याची खास रेसिपी 

 

साहित्य

१ ग्लास दूध

२ चमचे मिल्क पावडर

२ चमचे विरजण

शांत झोप लागत नाही, लगेच जाग येते? १ खास उपाय- मस्त झोप होऊन फ्रेश वाटेल

कृती

सगळ्यात आधी दूध एका पातेल्यामध्ये काढून घ्या. त्यामध्ये हळूहळू मिल्क पावडर घाला. मिल्क पावडर घालत असताना  दूध गोलाकार पद्धतीने हलवत राहा. जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत. 

मिल्क पावडर घातल्यामुळे दूध जास्त घट्ट होते. असे मिल्क पावडर घातलेले दूध काही वेळ गॅसवर उकळून घ्या आणि नंतर गॅस बंद करून दूध कोमट होऊ द्या.

 

दूध कोमट झाल्यानंतर त्यात विरजण घाला आणि रवीने किंवा व्हिस्कने दूध हलवून एकसारखे करून घ्या. आता हे दूध एका भांड्यात ओतून घ्या. भांड्यावर ॲल्युमिनियम फॉईल लावून ते पॅक करा. 

गाडी लागते- प्रवासात उलट्या, मळमळ होण्याचा त्रास? ५ उपाय- प्रवासाचा मस्त आनंद घ्याल

आता हे भांडे एखाद्या हॉटपॉटमध्ये ठेवून द्या. किंवा कुकर गॅसवर ठेवून थोडे गरम करून घ्या. त्यामध्ये एखादा जाडसर नॅपकिन टाकून ठेवा. आणि त्यावर दुधाचे भांडे ठेवून कुकरचे झाकण लावून घ्या. हे भांडे वारंवार हलवू नका. अगदी दोन ते अडीच तासात छान दही तयार झालेले असेल. 

दही सेट होऊन आणखी घट्ट होण्यासाठी ते काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून द्या. खूप छान मलाईदार दही खायला मिळेल. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल