Join us

How to make Crispy Kothimbir Vadi : १ जुडी कोथिंबीर वापरून करा खमंग, कुरकुरीत कोथिंबीर वडी; खायला खुसखुशीत, चवीला भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:16 IST

How to make Crispy Kothimbir Vadi : फक्त १० रूपयांच्या कोथिंबीरीपासून तुम्ही  खमंग, खुसखुशित कोथिंबीर वड्या बनवू शकता.

जेवणाबरोबर तोंडी लावणीसाठी काही असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी. हिवाळ्यात हिरवीगार कोथिंबीर  बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. (Cooking Hacks) उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीच्या दिवसात भाज्यांचे दरही कमी असतात. वाटणापासून, सजावटीपर्यंत ते पदार्थ सजवण्यासाठी कोथिंबीरीचा वापर केला जातो. फक्त १० रूपयांच्या कोथिंबीरीपासून तुम्ही  खमंग, खुसखुशित कोथिंबीर वड्या बनवू शकता. कोथिंबीर वडी बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.  (How to make kothimbir vadi)

1) सर्व प्रथम बेसन आणि तांदळाचे पीठ घेऊन त्यात थोडे पाणी टाकून स्लरी बनवा.

२) आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, तीळ, हिंग आणि आले मिरचीची

पेस्ट टाकून थोडा वेळ परतून घ्या. 

३) नंतर त्यात कोथिंबीर टाका आणि नंतर त्यात तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.

४) नंतर त्यात बेसनाचे द्रावण टाका आणि घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.

५) बेसन घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.

६) आता ते एका प्लेटमध्ये काढून त्याचे लहान तुकडे बनवा. 

७) नंतर तेलात तळून घ्या.

८) नंतर टिश्यू पेपर किंवा प्लेटमध्ये काढून घ्या.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न