Lokmat Sakhi >Food > Crispy Bhindi Recipe : कमी तेलात करा कुरकुरीत भेंडी; भेंडी फ्रायची सोपी रेसिपी, आवडीनं खातील सगळे

Crispy Bhindi Recipe : कमी तेलात करा कुरकुरीत भेंडी; भेंडी फ्रायची सोपी रेसिपी, आवडीनं खातील सगळे

How To Make Crispy Bhindi Recipe : भेंडी न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीनं खातील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:05 IST2025-08-29T17:58:24+5:302025-08-29T18:05:36+5:30

How To Make Crispy Bhindi Recipe : भेंडी न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीनं खातील.

How To Make Crispy Bhindi Recipe : Crispy Bhindi Recipe crispy lady finger | Crispy Bhindi Recipe : कमी तेलात करा कुरकुरीत भेंडी; भेंडी फ्रायची सोपी रेसिपी, आवडीनं खातील सगळे

Crispy Bhindi Recipe : कमी तेलात करा कुरकुरीत भेंडी; भेंडी फ्रायची सोपी रेसिपी, आवडीनं खातील सगळे

भेंडी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात (Cooking Hacks). पण भेंडीची भाजी तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता त्यावर भेंडीची चव कशी असते ते अवलंबून असतं. कुरकुरीत भेंडी करायला एकदम सोपी असते. ही भेंडीची भाजी तुम्ही आवडीनं खाऊ शकता. कुरकुरीत भेंडी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूया. भेंडी न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीनं खातील. (How To Make Crispy Bhindi Recipe) चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. घरी कोणी पाहूणे येणार असतील तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत भेंडी करू शकता.

कुरकुरीत भेंडीसाठी लागणारं साहित्य

१) भेंडी - २५० ग्रॅम

२) बेसन - २-३ मोठे चमचे

३) तांदळाचे पीठ - १ मोठा चमचा

४) लाल तिखट - १ चमचा

५) हळद - १/२ चमचा

६) धने पावडर - १/२ चमचा

७) जिरे पावडर - १/२ चमचा

८) चाट मसाला - १/२ चमचा (ऐच्छिक)

९) मीठ - चवीनुसार

१०) तेल - तळण्यासाठी

कुरकुरीत भेंडीची कृती

सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्या. ती पूर्णपणे कोरडी असणे आवश्यक आहे, अन्यथा कुरकुरीत होणार नाही. भेंडीचे देठ आणि टोक कापून घ्या आणि उभी पातळ चिरून घ्या.

एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेली भेंडी घ्या. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, चाट मसाला आणि मीठ घालून घ्या. हे सर्व हाताने चांगले मिसळा. जेणेकरून प्रत्येक भेंडीला मसाल्याचे आणि पिठाचे कोटिंग लागेल. जर मिश्रण खूप कोरडे वाटले तर पाण्याचा एक चमचा शिंपडून पुन्हा मिसळा.

कढईत तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर गरम होऊ द्या. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात थोडी थोडी भेंडी घालून मध्यम आचेवर तळून घ्या. भेंडी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेली भेंडी टिश्यू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल. गरमागरम कुरकुरीत भेंडी तुम्ही जेवणासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता.

 

Web Title: How To Make Crispy Bhindi Recipe : Crispy Bhindi Recipe crispy lady finger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.