भाजी, पोळी, वरण, भात असा रोजचा स्वयंपाक असला तरीही ताटात जोपर्यंत तोंडी लावायचे वेगवेगळे पदार्थ येत नाहीत, तोपर्यंत जेवणाची मजा काही वाढत नाही. चटणी, कोशिंबीर, लोणचं असे पदार्थ कसे जेवणात हवेच.. तोंडी लावण्याचे हे पदार्थ जर चवीला उत्तम जमून आले तर एखादेवेळी मग भाजीची किंवा वरणाची चव बिघडली तरी हरकत नाही. म्हणूनच अशा वेळी ही खोबरं- लसूण चटणी नेहमी तुमच्या घरात केलेली असू द्या.. तसंही खोबरं खाणं अतिशय पौष्टिक मानलं जातं. पण आपलं नियमितपणे ते खाणं होत नाही. म्हणूनच मग चटणीच्या माध्यमातून का असेना ते रोज खाल्लं जाईल (khobra lasun chutney recipe in marathi).. खोबऱ्याची चटणी तर जवळपास सगळीकडेच केली जाते (traditional maharashtrian recipe). पण आता आपण मराठवाडी पद्धतीने खोबऱ्याची चटणी कशी करायची ते पाहूया..(how to make coconut garlic chutney?)
खोबरं- लसूण चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी खोबऱ्याचे काप
१५ ते २० लसूण पाकळ्या
अर्धा टीस्पून जिरे
८ ते १० वाळलेल्या लाल मिरच्या
१ टेबलस्पून तेल
चवीनुसार मीठ
कृती
खोबरं, लसूण चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी तर खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यावेत.
यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवावी आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यात खोबऱ्याचे काप घालून सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यावे. खोबरं परतून घेत असताना गॅस मंद ते मध्यम ठेवावा. घाईघाईने मोठा गॅस करून खोबरे परतून घेतल्यास ते जळते आणि चटणीला करपट वास लागतो.
पावसाळा सुरू होण्याआधीच रोपांसाठी करून ठेवा 'हे' घरगुती खत, बाग वर्षभर हिरवीगार- फुललेली राहील
यानंतर खोबरे कढईतून काढून घ्यावे आणि त्याच कढईमध्ये पुन्हा थोडेसे तेल घालून वाळलेल्या लाल मिरच्या आणि लसूण अगदी अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यावा. लसणाचा रंगही बदलणार नाही एवढा कमी तो परतून घ्यावा. खोबरे, मिरच्या, लसूण थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घालावे.
याचवेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, अर्धा ते पाऊण टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठसुद्धा घालावे. सगळे पदार्थ मिक्सरमध्ये एकत्रित वाटून त्याची चटणी करून घ्यावी.
पालींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा १ खास उपाय! पुन्हा चुकूनही पाल घरात शिरणार नाही
ही खमंग झणझणीत चवीची चटणी १५ दिवस अगदी फ्रेश राहाते. शिवाय लसूणही आपण परतून घेतल्यामुळे चटणीला लसणाचा उग्र वासही येत नाही.