Join us  

कधी ‘चवळी फ्राय’ खाऊन पाहिलं आहे? १० मिनिटांत होणारी चमचमीत रेसिपी, विसराल नेहमीची उसळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 1:23 PM

How to make Chawli Fry; check out delicious recipe : कपभर चवळीची करा चटपटीत चवळी फ्राय; टिफिन किंवा स्नॅक्ससाठी बेस्ट

महाराष्ट्रीयन लोकांसाठी उसळ म्हणजे आवडीचा पदार्थ (Cooking Tips). घरात भाजी नसेल तर, आपण कडधान्यांची उसळ तयार करतो. कडधान्यांमध्ये मूग, मटकी किंवा चवळीची उसळ आवडीने खाल्ली जाते. पण आपण कधी चवळी फ्राय करून पाहिलं आहे का? बहुतांश जण चवळीची उसळ, कटलेट किंवा चवळीचे वडे तयार करतात. पण आपण कधी चवळी फ्राय करून पाहिलं आहे का?

चवळी फ्राय हा पदार्थ टिफिनसाठी आपण तयार करून देऊ शकता (Kitchen Tips). किंवा भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, चवळी फ्राय ही रेसिपी करून पाहा (Chawli Fry). चवळी फ्राय ही चटपटीत रेसिपी आपण स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता. किंवा नाश्त्याला आपण चवळी फ्राय खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरेल. शिवाय आरोग्यालाही फायदा होतो(How to make Chawli Fry; check out delicious recipe).

चवळी फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य

चवळी

तेल

जिरे

हिंग

कडीपत्त्याची पानं

केसांना तेल-मास्क लावूनही वाढ होत नाही? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; मुळे आतून मजबूत होतील

कांदा

लसूण

टोमॅटो

हळद

लाल तिखट

गरम मसाला

धणे पूड

मीठ

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक मोठा चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरे, चिमुटभर हिंग, कडीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पूड आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालून मिक्स करा.

व्हिटॅमिन के डेफिशियन्सी तर नाही तुम्हाला? हाडांची कुरकूर-बीपीही वाढते? खा ‘हे’ व्हिटॅमिन केयुक्त पदार्थ

गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात कपभर भिजवलेली चवळी घालून मिक्स करा. त्यावर २ मिनिटांसाठी झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढून त्यावर कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे चटपटीत चवळी फ्राय खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स