Join us

घरीच करा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी; २ मिनिटांत बनेल सोपी रेसिपी, कॅफेसारखी गरमागरम थिक कॉफी घरीच बनेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 19:53 IST

How To Make Cappuccino Coffee At Home : घरात कोणीही पाहूणे आल्यानंतर किंवा स्वत:ला एक मस्त ट्रिट देण्यासाठी तुम्ही घरच्याघरी कॅपेचिनो कॉफी बनवू शकता.

चहा, कॉफी प्यायला प्रत्येकालाच आवडते. पण बाहेर कॅफेजमध्ये मिळते तशी कॉफी घरी करता येत नाही. कॉफी बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करू शकता. यामुळे घरच्याघरी विकतसारखी कॅपेचिनो कॉफी बनवता येईल. (How To Make a Cappuccino At Home) घरात कोणीही पाहूणे आल्यानंतर किंवा स्वत:ला एक मस्त ट्रिट देण्यासाठी तुम्ही घरच्याघरी कॅपेचिनो कॉफी बनवू शकता. ही कॉफी करण्यासाठी तुम्हाला  फक्त ४ ते ५ पदार्थ लागतील. यात तुम्ही  वेगवेगळे फ्लेवर्सही देऊ शकता. (How To Make Cappuccino Coffee At Home)

कॅपेचिनो कॉफीसाठी लागणारं साहित्य

१) इन्स्टंट कॉफी पावडर - 2 चमचे

२) साखर - 2 चमचे (आवश्यकतेनुसार)

३) गरम पाणी - 2 चमचे

४) दूध - 1 कप

५) चॉकलेट पावडर किंवा कोको पावडर (सजावटीसाठी)

कॅपेचिनो कॉफीची सोपी कृती

एका मोठ्या वाटीत किंवा भांड्यात कॉफी पावडर आणि साखर एकत्र घ्या. त्यात 2 चमचे गरम पाणी घालून मिश्रण चांगलं ढवळून घ्या. हे मिश्रण ढवळण्यासाठी चमचा किंवा छोटा हँड ब्लेंडर वापरू शकता.

आता महत्त्वाचं काम म्हणजे हे मिश्रण फेस येईपर्यंत फेटायचं.तुम्ही जेवढं जास्त फेटाल, तेवढा चांगला फेस तयार होईल. यासाठी 10-15 मिनिटं लागतील. फेटल्यानंतर मिश्रण हलकं आणि क्रीमी दिसेल.

ब्रेस्टचा आकार वाढत नाही-बारीक दिसता? ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी करा ५ उपाय, सुडौल दिसाल

दुसरीकडे एका भांड्यात दूध गरम करून घ्या. दूध खूप जास्त उकळू नका. ते फक्त गरम करायचं आहे.आता कॉफीचा कप घ्या. त्यात तयार केलेला फेस घातलेलं मिश्रण, अर्ध्या कपपेक्षा थोडं कमी टाका. वर गरम दूध ओता.

दूध ओतताना ते हळू आणि सावधगिरीने ओता. कपमध्ये वरपर्यंत फेस दिसेल. मस्त कॅपेचिनो कॉफी तयार आहे. वरून थोडी चॉकलेट पावडर किंवा कोको पावडर किंवा लिक्वीड चॉकलेट घालून सजवा.

कॉफी परफेक्ट होण्यासाठी टिप्स

1) क्रिमी आणि जाड फेस मिळवण्यासाठी चांगल्या क्वालिटीची इन्स्टंट कॉफी वापरू शकता.

2) फेस तयार करताना मिश्रण एकाच दिशेने फेटा.

 ढाबास्टाईल पनीर भुर्जी करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल चटपटीत पनीर भुर्जी

3) गरम दुधामुळे कॉफीचा फेस कपमध्ये तरंगतो आणि कॅफेसारखाच दिसतो.

4) आवडीनुसार तुम्ही यात दालचिनी पावडर किंवा व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब घालू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स