Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाड्यावर मिळते तशी चटपटीत भेळ घरी जमतच नाही? बघा खास ट्रिक, भेळ होईल एकदम चवदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 12:27 IST

Bhel Recipe: गाड्यावर मिळते तशी भेळ आपल्याला घरी का जमत नाही, असा प्रश्न पडला असेल तर या काही खास टिप्स बघाच..(how to make bhel at home?)

भेळ हा बहुतांश लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर स्वस्तात मस्त मिळणारा पदार्थ म्हणजे भेळ. अगदी कोणत्याही ऋतूमध्ये भेळ चालू शकते. शिवाय भेळ खायची म्हटलं तर पोटात भूक असायलाच हवी असंही काही नसतं. कारण खरे भेळप्रेमी ती कधीही खाऊ शकतात. पण प्रत्येकवेळी भेळच्या गाडीवर जाऊन ती खाणं कंटाळवाणं होतं. त्यामुळे मग बरेच जण ती घरी करतात (how to make bhel at home?). पण घरी केलेल्या भेळीला विकतसारखी चव येत नाही, असं कित्येकांचं म्हणणं आहे (crispy, tasty bhel recipe). तुम्हालाही तसंच वाटत असेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवून भेळ करून पाहा..(how to make chatpati bhel at home?)

गाड्यावर मिळते तशी चटपटीत भेळ घरी करण्यासाठी काही टिप्स..

 

१. मुरमुरे, शेव आणि फरसाण यांचा अंदाज चुकला की मग भेळची टेस्ट हुकते. म्हणूनच या ३ पदार्थांचे प्रमाण व्यवस्थित जमायला हवे. यासाठी जर तुम्ही पाव किलो मुरमुरे घेणार असाल तर १ वाटी बारीक शेव, १ वाटी तिखट शेव आणि दिड वाटी फरसाण असं प्रमाण ठेवा.

चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

२. भेळमध्ये जो बटाटा घालाल त्यामध्ये थोडा कांदा, काळं मीठ आणि चाट मसाला मिक्स करा आणि मग बटाटा भेळीमध्ये घाला. यामुळे भेळीची चव जास्त खुलते.

 

३. भेळीला चटकदार चव देणारा पदार्थ म्हणजे चिंच आणि पुदिन्याचं पाणी. यामध्ये चिंचेचं पाणी जास्त ठेवावं. चिंचेच्या पाण्याला थोडा गोडवा देण्यासाठी त्यात गूळ किंवा खजूर घालावा. 

अंगाला येणारा घाम आणि घामाचा वास सांगतो शरीरात काय बिघडतंय, दिसायला फिट पण तुम्ही आजारीच..

४. भेळीमध्ये लाल तिखट तर असतेच. पण त्यासोबतच जर सुक्या लाल मिरच्यांचं वाटण किंवा कमी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्यांचं वाटण जर घातलं तर भेळीला जास्त छान चव येते. यासाठी लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या, लसूण थोडासा तेलामध्ये परतून घ्या आणि मग पाणी घालून त्याचं पातळ वाटण करा. हे वाटण भेळीला छान चव आणि रंग देतं.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Make street-style Bhel at home with these simple tricks.

Web Summary : Craving street-style Bhel? Achieve that perfect taste at home! Balance puffed rice, sev, and farsan. Add spiced potatoes, flavorful tamarind-mint chutney, and chili paste for an authentic, chatpati Bhel experience.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स