बाजरीची भाकरी (Bhakri) चवीला उत्कृष्ट असली तरी ती मऊ आणि टम्म फुगलेली करणं ही एक कला आहे. बाजरीमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे ती लाटताना किंवा थापताना तुटण्याची शक्यता असते. काही खास टिप्स वापरल्यास तुमचं काम सोपं होईल. बाजरी दळताना ती एकदम बारीक दळलेली असावी. पीठ रवाळ असेल तर भाकरी नीट थापता येत नाही. (How To Make Bajrichi Bhakri)
1) बाजरीचं पीठ मळताना साधं पाणी न वापरता कडकडीत गरम पाण्याचा वापर करा. यामुळे पिठातील चिकटपणा वाढतो आणि भाकरी चिरत नाही. पिठात थोडं मीठ घालून त्यात गरम पाणी घाला आणि चमच्यानं एकजीव करा. थोडं कोमट झाल्यावर हातानं मळून घ्या. (Bajri Bhakari Recipe)
2) भाकरी मऊ होण्याचे श्रेय पीठ किती मळले आहे यावर असते. पीठ एकदम जास्त मळून ठेवू नका. प्रत्येक भाकरीसाठी ताजे पीठ मळा. पिठाचा गोळा हाताच्या तळव्यानं किमान २ ते ३ मिनिटं चांगला रगडून मळून घ्या. पीठ जितकं लोण्यासारखं मऊ होईल तितकी भाकरी छान फुगेल.
रोज पाणी घालता तरी फुलंच येत नाही? कुंडीत 'हा' पांढरा पदार्थ कालवा, भराभर येतील गुलाब
3) कोरडे पीठ खाली टाकताना ते जास्त जाड नसावं. भाकरी थापताना कडांनी हातानं थोडी दाबून घ्यावी जेणेकरून तिला चिरा पडणार नाहीत. भाकरी खूप जास्त जाड किंवा खूप पातळ नसावी. मध्यम जाडीची भाकरी चांगली फुगते.
4) भाकरी तव्यावर टाकल्यानंतर वरच्या बाजूनं हातानं पाणी लावताना ते समान फिरवा. कुठेही कोरडी जागा राहू नये नाहीतर भाकरी फुगत नाही. वरचं पाणी थोडं सुकले की भाकरी लगेच उलटवून घ्या. दुसरी बाजू पूर्णपणे भाजेपर्यंत वाट पाहा. जोपर्यंत दुसरी बाजू व्यवस्थित भाजली जात नाही तोपर्यंत भाकरी नीट फुगत नाही.
घरच्या इडल्या कडक होतात? ८ ट्रिक्स, मऊसूत-पांढऱ्याशुभ्र होतील इडल्या-पीठ दुप्पट फुलेल
5) दुसरी बाजू भाजल्यावर भाकरी पुन्हा उलटवून घ्या किंवा थेट गॅसच्या फ्लेमवर धरा ती टम्म फुगेल. जर बाजरीचे पीठ खूपच जुने असेल तर भाकरी कोरडी पडते. शक्यतो ताजे दळलेले पीठ वापरा. जर पीठ जुने असेल तर त्यात थोडं गव्हाचं पीठ किंवा उकडलेला बटाटा किसून घातल्यास भाकरी मऊ राहते. भाकरीसाठी तवा मध्यम गरम असावा. भाकरी भाजून झाल्यावर लगेच ती सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे भाकरी वाफेने मऊ होते आणि कडक होत नाही.
