कुरकुरीत, खमंग आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या अळूवडीची चव महाराष्ट्राच्या घराघरात फारच लोकप्रिय आहे. अळूची पाने, मसाला, बेसन यांच्या परफेक्ट मिश्रणातून तयार होणारी ही अळूवडी चविष्ट तर असतेच, पण सोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील तितकीच फायदेशीर असते. अळूवडी म्हटलं की, ती खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाहीच. बरेचदा आपल्याकडे खास प्रसंग, सणवार असलं की अळूचीवडी मोठ्या हौसेने केली जाते. अळूवडी करायची म्हटलं की, अळूच्या एक-एक पानाला पीठ लावून काळजीपूर्वक रोल करण्याची किचकट प्रक्रिया डोळ्यासमोर येते. बऱ्याचदा रोल व्यवस्थित (Tasty Alu Vadi with unique method) झाला नाही, तर वडी वाफवताना किंवा तळताना सुटते, ज्यामुळे मेहनत वाया जाते. अळूवडी तयार करण्याच्या या पारंपरिक पद्धतीनुसार वर्षानुवर्षे घरोघरी याच पद्धतीने अळूवडी केली जाते. परंतु अळूवडी करण्याची नेहमीची तीच ती पारंपरिक पद्धत वापरण्यापेक्षा, थोडा मॉडर्न ट्विस्ट देत झटपट अळूचीवडी तयार करु शकतो(How to make Alu Vadi with twist).
रोल न करताच तयार होणारी ही लेअर्सने भरलेली अळू वडी दिसायला सुंदर, खायला कुरकुरीत आणि चवीला अगदी पारंपरिक वडीसारखीच लागते. शिवाय ही पद्धत वेळ वाचवणारी आणि अगदी पहिल्यांदा वडी करण्याऱ्यांसाठी देखील परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया, नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या या खास स्टाइलमध्ये अळू वडी कशी बनवायची. कमी वेळात, फारशी मेहेनत न घेता आणि अचूकपणे लेअर्सवाली, खमंग अळूवडी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. अळूची पाने - ६ ते ७ पाने
२. बेसन - १/४ कप
३. आले - १ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
४. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)
५. लसूण पाकळ्या - ५ ते ८
६. जिरे - १ टेबलस्पून
७. हळद पावडर - १ टेबलस्पून
८. ओवा - १/२ टेबलस्पून
९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१०. धणेपूड - १/२ टेबलस्पून
११. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून
१२. लिंबाचा रस - १ ते २ टेबलस्पून
१३. हिंग - १/४ टेबलस्पून
१४. मीठ - चवीनुसार
१५. तेल - तळण्यासाठी
१६. मोहरी - १/२ टेबलस्पून
१७. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
कवडी दही लावण्याची राजस्थानी पारंपरिक पद्धत! दही होईल घट्ट व दाटसर - विकतचे दही जाल विसरुन...
उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त...
कृती :-
१. सर्वात आधी अळूची पाने स्वच्छ धुऊन - पुसून घ्या आणि त्यांच्या शिरा हलकेच कापून त्यावर लाटणं फिरवून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ घेऊन त्यात आले - हिरव्या मिरच्या - जिरे यांची एकत्रित वाटलेली पेस्ट घालावी. मग त्यात हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून हे बेसन बॅटर चमच्याने एकजीव करून घ्यावे.
२. एका सपाट, पृष्ठभाग असणारे बोर्ड किंवा केक टिन घेऊन त्यात अळूची पाने व्यवस्थित पसरवून ठेवावी आणि त्या पानावर तयार केलेले बॅटर व्यवस्थित लावावे. मग त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा बेसनचे बॅटर लावावे. असे एकावर एक अळूचे पान आणि बेसन बॅटर लावून अळूवडीचे लेअर्स तयार करून घ्यावेत. मग सर्वात शेवटच्या पानाला बेसन बॅटर लावून त्यावर थोडे तीळ भुरभुरावेत.
३. एका मोठ्या कढईत पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. मग या कढईवर एक स्टँड ठेवून त्यावर अळूवडीचे भांडे ठेवून वरून झाकण ठेवायचे. वाफेवर अळूवडी १५ ते २० मिनिटे व्यवस्थित शिजू द्यावी. २० मिनिटानंतर अळूवडी व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करून थंड झाल्यावर मिश्रण बाहेर काढून सुरीच्या मदतीने चौकोनी आकारात वड्या पाडून घ्याव्यात. वड्या पाडल्यानंतर आपण पाहू शकता की, या अळूवडीला छान असे लेअर्स आलेले दिसतील.
४. मग एका भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी आणि जिरे घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही फोडणी तयार वड्यांवर तुमच्यासमोर ओतावी. मग एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन वड्यांना शॅलो फ्राय करून घ्याव्यात. आपल्या आवडीनुसार आपण वड्यांना तेलात डीप फ्राय देखील करू शकता.
भरपूर लेअर्सची खुसखुशीत, खमंग चवीची मॉर्डन स्टाईल अळूवडी खाण्यासाठी तयार आहे. नेहमीची ती पारंपारिक अळूवडी आपण करतोच पण एकदा अशा प्रकारची अळूवडी नक्की ट्राय करून पहा.
