कैऱ्यांचा सिझन आता जवळपास संपला आहे. पण तरीही बाजारात गेल्यानंतर काही ठिकाणी कैऱ्या दिसत आहे. आता या कैऱ्या अगदी शेवटच्या टप्प्यातल्या आहेत. त्यामुळे त्या संपण्याआधी लवकर कैऱ्या विकत घेऊन टाका आणि झटपट घरच्याघरी आमचूर पावडर तयार करा. वेगवेगळ्या रेसिपींमध्ये आमचूर पावडर खूप उपयोगी ठरते. बाजारात विकत घ्यायला गेल्यावर तिच्यासाठी खूप जास्त किंमत मोजावी लागते (simple and easy recipe of making aamchur powder). त्यामुळेच नंतर महागडी आमचूर पावडर विकत घेण्यापेक्षा आता कैऱ्या मिळत आहेत (how to make aamchur powder at home?) तर त्या घेऊन त्यांच्यापासूनच अगदी वर्षभर पुरेेल एवढी आमचूर पावडर तयार करून ठेवा.(Aamchur powder recipe)
आमचूर पावडर करण्याची रेसिपी
घरच्याघरी आमचूर पावडर तयार करणं अगदी सोपं आहे. आमचूर पावडर तयार करण्यासाठी अशा कैऱ्या निवडाव्या ज्या चवीला थोड्या आंबट असतील.
मोठ्या आकाराच्या २ ते ३ कैऱ्याही पुरेशा आहेत. त्या आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांच्या देठाकडचा भाग काढून घ्या.
जेनेलिया डिसुझाची मुलांकडून ‘ही’ एकच अपेक्षा, कुणी एकटं-उदास असेल तर माझ्या मुलांनी..
यानंतर कैरीचे अगदी बारीक, पातळ काप करा. जर कैरी चिरत बसण्यापेक्षा थोडी मोठी छिद्रे असणाऱ्या किसनीने तुम्ही कैरी किसून घेतली तरी चालते. आता कैरीचे काप किंवा कैरीचा किस एका ताटामध्ये पसरवून ठेवा आणि उन्हामध्ये २ ते ३ दिवस वाळू द्या.
सध्या सगळीकडे पावसाळी हवा असल्याने स्वच्छ सुर्यप्रकाश नाही. त्यामुळे एखादा दिवस कैरीचे काप ताटात पसरवून ठेवल्यानंतर त्याच्यातलं मॉईश्चर जरा कमी झालं की मग गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात कैरीचे काप किंवा किस तापवून घ्या. त्यानंतर पुन्हा ते एखादा दिवस उन्हात ठेवून द्या.
कैरी वाळून कडक झाल्यानंतर ती मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. यासाठी कैरीतला ओलावा पुर्णपणे गेलेला असेल याची मात्र काळजी घ्या. आता तयार केलेली आमचूर पावडर चाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा. ही पावडर कित्येक महिने अगदी चांगली टिकते.