चपात्या प्रत्येकाच्याच घरी केल्या जातात. पण चपात्या करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. बऱ्याच जणांच्या चपात्या वातड होतात तर काहींच्या चपात्या फुगतच नाहीत. मऊ-मुलायम फुललेली चपाती करण्यासाठी तुम्ही चपातीचं पीठ कसं मळता हे फार महत्वाचं असतं. जर तुमच्या चपात्या मऊ, फुललेल्या होत नसतील तर तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर करून चपात्यांचं पीठ मळू शकता. चपात्या मऊ-मुलायम होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (How To Knead Soft Dough For Fluffy Roti Easy Milk And Water Method)
दुधाचा वापर करून असं पीठ मळा
दुधाचा वापर करून पीठ मळण्यासाठी सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घ्या. त्यानंतर त्यात दूध घाला. एका मिक्सिंग बाऊलमध्ये पीठ घाला. नंतर यात हळूहळू दूध मिसळून घट्ट पीठ मळून घ्या. पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. ५ मिनिटं व्यवस्थित पीठ मळून घ्या. असं केल्यानं चपात्या मऊ आणि छान फुगलेल्या होतील.
कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने
पीठ मळण्यासाठी जर तुम्ही दोन्ही हातांचा वापर केला तर पीठ छान मळलं जातं. दूध घालून पीठ मळल्यानंतर लगेच चपाती करायला सुरूवात करू नका. काहीवेळ पीठ तसंच झाकून ठेवून द्या त्यानंतर चपात्या करा. ज्यामुळे एकदम फुललेल्या-मऊ चपात्या होतील. दूध घालून केलेल्या कणकेची पोळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. दूध कणकेत मिसळणं हा चांगला पर्याय असू शकतो.
पाणी घालून पीठ मळण्याची योग्य पद्धत कोणती?
गव्हाचं पीठ व्यवस्थित पाणी घालून मळण्याची योग्य प्रक्रिया माहित करून घ्यायला हवी. पाणी हळूहळू मिसळा जेणेकरून पीठ जास्त घट्ट होणार नाही. काही लोक एकत्रच भरपूर पाणी घालतात जी पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. हळूहळू हातांमध्ये घेऊन पाणी मिसळा.
घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा
कणीक मळताना मध्ये मध्ये पाणी घालताना हातानं अंदाज घेऊन पाणी घाला. ही प्रक्रिया जवळपास ५ ते ६ मिनिटं करा. नंतर यात थोडं तेल मिसळून व्यवस्थित एकजीव करून घ्या. या पद्धतीनं कणीक मळल्यास चपात्या मऊ-मुलायम होतील आणि व्यवस्थित फुगतील.
