थंडीच्या दिवसांत हवेत गारवा वाढला की त्याचा परिणाम फक्त आपल्या त्वचेवरच नाही, तर अन्नपदार्थांवरही होतो. विशेषतः गृहिणींची एक तक्रार कायम असते ती म्हणजे, थंडीमुळे चपात्या लवकर कडक, सुक्या किंवा वातड होतात. गरम असताना मऊ वाटणारी चपाती डब्यात ठेवल्यावर किंवा काही वेळाने खाताना मात्र कडक, वातडच होते. अनेकदा असं होतं की, सकाळी डब्यासाठी केलेल्या चपात्या दुपारपर्यंत इतक्या कडक किंवा वातड होतात की त्या खाणं नकोसं वाटतं. थंडीतील कोरड्या हवेमुळे चपातीतील ओलावा निघून जातो आणि ती कोरडी होते(how to keep rotis soft in winter).
या कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत चपात्या मऊ, मुलायम, नरम ठेवणे थोडे अवघड कामच वाटते. खरंतर, पीठ मळण्यापासून ते चपाती डब्यात ठेवण्यापर्यंतच्या लहान - सहान चुकांमुळे चपात्या सुक्या आणि वातड होतात. डब्यातली चपाती दिवसभर मऊ, नरम राहावी यासाठी फक्त कणीक व्यवस्थित मळून चालत नाही, तर काही खास 'ट्रिक्स' वापराव्या लागतात. हिवाळ्यात चपात्यांचा (simple trick to make soft chapati in cold weather) मऊपणा दिवसभर टिकवून ठेवण्यासाठी खास टिप्स पाहूयात
हिवाळ्यात चपात्या कोरड्या, वातड आणि सुक्या होतात...
१. थंडीत पीठ मळण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे पिठातील ग्लुटेन सक्रिय होते आणि चपात्या मऊ होतात. पीठ मळताना त्यात पाणी आणि थोडे दूध किंवा १ चमचा दुधाची साय घातल्यास चपात्या कापसासारख्या मऊ होतात आणि बराच वेळ तशाच राहतात. पीठ मळून झाल्यावर शेवटी हाताला थोडे तेल किंवा तूप लावून पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्या.
२. थंडीत पीठ खूप घट्ट मळू नका. पीठ थोडे मऊ असावे. पीठ मळल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवा. यामुळे पिठाला चांगला लवचिकपणा येतो.
नको डाळ-तांदूळ, नको पीठ आंबवण्याची झंझट! फक्त १५ मिनिटांत करा पांढरीशुभ्र, गुबगुबीत जाळीदार इडली...
३. चपाती लाटताना खूप जास्त कोरडे पीठ लावू नका. जास्त कोरड्या पिठामुळे चपाती भाजताना कडक होते. चपाती भाजताना गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवा. अगदी मंद आचेवर चपाती भाजल्यास ती कडक किंवा वातड होते.
४. चपाती तव्यावरून काढल्याबरोबर थेट डब्यात ठेवू नका. प्रथम एका सुती रुमालात गुंडाळा आणि मगच कॅसरोल किंवा डब्यात ठेवा. यामुळे वाफेचे पाणी चपातीला लागत नाही आणि ती मऊ राहते.
पारंपरिक राजस्थानी स्टाईल कच्च्या ओल्या हळदीची भाजी! एकदा खाल्ली तर चव विसरणार नाही, पाहा रेसिपी...
५. जर चपात्या खूपच कडक झाल्या असतील, तर डब्यात चपातीसोबत एक आल्याचा छोटा तुकडा किंवा ओल्या पालेभाजीचे एक देठ ठेवा. त्यातील ओलाव्यामुळे चपात्या मऊ राहण्यास मदत होते.
६. चपाती भाजून झाल्यानंतर तव्यावरुन काढल्यावर, गरम चपातीवर हलकंसं तेल किंवा तूप लावल्यास थंडीत सुद्धा चपाती कोरडी पडत नाही.
