पोळी म्हणजेच रोजच्या आहारात खाल्ली जाणारी गव्हाची चपाती आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. अनेकजणांना गरमागरम पोळ्या खायला आवडतात तर काहीजणांना रूम टेम्परेचरवरच्या पोळ्या आवडतात. बऱ्याचजणांची अशी तक्रार असते की पोळ्या वातड होतात, पोळ्या मऊ राहण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to keep chapati fresh for long time)
पोळी जास्तवेळ मऊ राहण्यासाठी काय करावं?
पोळी केल्यानंतर मऊ कॉटनच्या कापडात बांधून ठेवा. ज्यामुळे मऊ राहतील आणि खातानाही त्रास होणार नाही. पोळ्या ठेवण्यासाठी काचेचं भांडं वापरा. यामुळे हवा बाहेर येईल आणि चपात्या कडक होणार नाही. ज्यामुळे दीर्घकाळ पोळ्या फ्रेश राहतील. पोळ्या फॉईल पेपरमध्ये लपेटून ठेवा ज्यामुळे फ्रेशनेस टिकून राहील आणि सॉफ्ट राहतील. पोळी फ्रेश ठेवण्यासाठी हा उपाय करु शकता कोमट पाण्यानं पीठ मळा, या पद्धतीनं पीठ मळल्यास पीठ मुलायम राहण्यात मदत होईल.
पीठ मळण्यासाठी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. यामुळे पोळ्यांना मऊपणा येईल. पीठ नीट मळणे गरजेचे आहे. जितके जास्त मळाल तितकी पोळी मऊ, फुगलेली होते. पीठाला थोडे तेल लावून १५–२० मिनिटे झाकून ठेवल्यास पोळ्या मऊ होतात. तवा आणि भाजण्याची पद्धतसुद्धा महत्वाची आहे. फ्लेम मध्यम ठेवा. जास्त फ्लेम ठेवल्यास पोळ्या करपू शकता आणि कमी ठेवल्यास चपात्या कच्च्या राहतात.
तान्ह्या बाळाला घुटी देताय? डॉक्टर सांगतात, म्हणून बाळ पडतं आजारी आणि करतं किरकिर
काठ व्यवस्थित भाजा. काठ नीट भाजल्याने पोळी बरोबरीने फुलते. तेल किंवा तूप लगेच लावा. पोळी तव्यावरून काढल्यावर लगेच हातभर तेल किंवा तूप लावून दुमडून ठेवा ज्यामुळे मऊपणा टिकतो. तुम्ही रात्रीची कणीक सकाळी वापरणार असाल तर कणीक हवाबंद डब्यात किंवा एल्युमिनियम फॉइलमध्ये फ्रिजमध्ये ठेवल्यास ती २ दिवस ताजी राहतं. फ्रिजमधून काढण्याअगोदर थोडं बाहेर ठेवा, नंतर मळून वापरा.