Join us

चपातीत कमी असलेलं प्रोटीन आणि फायबर कसं वाढवाल? पीठ मळताना टाका 'या' गोष्टी मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:42 IST

Food Tips : काही सोप्या टिप्स वापरून आपण आपल्या चपातीमध्ये अधिक प्रोटीन आणि फायबर वाढवू शकता. ते कसे हेच आज आपण पाहणार आहोत.

Food Tips : सामान्यपणे रोज घराघरांमध्ये गव्हाच्या पिठाची चपाती खाल्ली जाते. पण आजकाल गव्हाची क्वालिटी घसरल्यामुळे या चपात्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरसारखे पोषक तत्व कमी असू शकतात? म्हणजे अनेकदा तयार पीठ बाजारातून आणलं जातं आणि त्यापासून मुलायम आणि टेस्टी चपात्या बनवल्या जातात. पण अनेक लोक हे करत असताना पोषणाकडे लक्षच देत नाहीत. याचा परिणाम असा होतो की, शरीराला पुरेशी एनर्जीच मिळत नाही, पचन तंत्र बिघडतं आणि लवकर थकवाही जाणवू लागतो.

पण असं असलं तरी चिंतेची फार काही बाब नाही. कारण काही सोप्या टिप्स वापरून आपण आपल्या चपातीमध्ये अधिक प्रोटीन आणि फायबर वाढवू शकता. ते कसे हेच आज आपण पाहणार आहोत.

मल्टीग्रेन पिठाचे फायदे

रोज केवळ गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाण्याऐवजी गव्हाच्या पिठामध्ये ज्वारी, बाजरी, रागी इतर धान्यांचे पीठ मिक्स करा. यानं टेस्ट तर वाढेलच, सोबतच चपातीमध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाणही अनेक पटीने वाढेल. या धान्याचे पीठ समान प्रमाणात घेऊनही मिक्स करू शकता. नंतर चपाती बनवा.

डाळींचं पीठ

सामान्यपणे गव्हाच्या पिठात डाळीचं पीठ सामान्यपणे कुणी मिक्स करत नाही. पण असं करणं फायदेशीर ठरू शकतं. गव्हाच्या पिठात थोडं बेसन किंवा मूगाच्या डाळीचं पीठ मिक्स करू शकता. या मिश्रणाच्या चपातीमध्ये   प्रोटीनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. 

भाज्यांचाही मिळतो फायदा

चपातीमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी पीठामध्ये बारीक केलेल्या भाज्या जसे की, गाजर, पालक, दुधी भोपळाही, कांदा आणि कोथिंबीर मिक्स करा. असं केल्यास टेस्ट तर वाढेलच, सोबतच चपातीमधील पोषणही वाढेल. लहान मुलांना अशाप्रकारे भाज्याही खाता येतात.

बियांचाही फायदा

वेगवेगळ्या छोट्या छोट्या बारीक बिया सुद्धा खूप फायदेशीर असतात. जर पिठात अळशीच्या बिया, तीळ किंवा चिया सीड्स पावडर मिक्स केलं तर बरेच फायदे मिळतात. या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड आणि फायबर असतं, जे हृदयसाठी आणि पचनासाठी फायदेशीर असतं. 

पीठ मळण्याची योग्य पद्धत

जर आपल्याला हेल्दी चपाती हवी असेल तर पीठ मळताना पाण्याऐवजी ताक किंवा दह्याचा वापर करा. यामुळे चपाती मुलायम आणि पौष्टिक होईल. हे कसं करायचं नसेल तर पीठ चांगलं मळून झाल्यावर साधारण 15 ते 20 मिनिटं तसंच झाकून ठेवा. असं करूनही चपात्या मुलायम होतील.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स