Lokmat Sakhi >Food > तुम्ही इंजेक्शन दिलेला दुधी तर खात नाही ना? 'असा' दिसणारा दुधी भोपळा खाणं टाळा- आरोग्यासाठी घातक

तुम्ही इंजेक्शन दिलेला दुधी तर खात नाही ना? 'असा' दिसणारा दुधी भोपळा खाणं टाळा- आरोग्यासाठी घातक

How To Identify Injected Lauki: दुधी भोपळ्याला (bottle gourd ) सुद्धा इंजेक्शन देऊन त्याचा आकार मोठा केला जातो. असा भोपळा खाणं आरोग्यासाठी त्रासदायकच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2025 14:28 IST2025-07-24T14:27:58+5:302025-07-24T14:28:45+5:30

How To Identify Injected Lauki: दुधी भोपळ्याला (bottle gourd ) सुद्धा इंजेक्शन देऊन त्याचा आकार मोठा केला जातो. असा भोपळा खाणं आरोग्यासाठी त्रासदायकच..

how to identify the differences between injected lauki or bottle gourd and non-injected lauki | तुम्ही इंजेक्शन दिलेला दुधी तर खात नाही ना? 'असा' दिसणारा दुधी भोपळा खाणं टाळा- आरोग्यासाठी घातक

तुम्ही इंजेक्शन दिलेला दुधी तर खात नाही ना? 'असा' दिसणारा दुधी भोपळा खाणं टाळा- आरोग्यासाठी घातक

Highlightsनैसर्गिकपणे पिकलेल्या दुधी भोपळ्यामधला गर थोडा जाडसर असतो. तर इंजेक्शन दिलेल्या भोपळ्यामधला गर मऊ आणि शुभ्र पांढरा असतो.

हल्ली प्रत्येक गोष्टीतली भेसळ वाढली आहे. सणवार जवळ आले की पेढे, मिठाई, तूप, दूध या पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. अगदी हळद, तिखट, मसाले यांच्यातही भेसळ होते. वेगवेगळ्या फळांना इंजेक्शन देऊन तसेच कित्येक प्रकारच्या वेगवेगळ्या केमिकल्समध्ये ठेवून पिकवलं जातं ते तर आपल्याला माहितीच आहे. आता तर दुधी भोपळाही त्याला अपवाद नाही. बाजारात मिळणाऱ्या दुधी भोपळ्याचं जर बारकाईने निरिक्षण केलं तर त्यांच्यातला बदल तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतो. पौष्टिक असतो म्हणून दुधी भोपळा आणि नेहमीच खातो. पण तोच जर केमिकलचं इंजेक्शन देऊन फुगविण्यात आला असेल तर असा भोपळा खाणं आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करू शकतो.(how to identify the differences between injected lauki or bottle gourd and non-injected lauki?)

इंजेक्शन देऊन पिकविण्यात आलेला दुधी भोपळा कसा ओळखायचा?

 

दुधी भोपळा खरेदी करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला इंजेक्शन देऊन पिकवलेला दुधी भोपळा आणि नैसर्गिकपणे पिकवलेला दुधी भोपळा यांच्यातला फरक अगदी सहज ओळखता येईल.

गुरुपुष्यामृत- चांदीच्या दिव्यांची करा खरेदी, पाहा चांदीच्या दिव्यांच्या सुंदर आणि परवडणारे डिझाइन्स

१. इंजेक्शन देऊन पिकवलेल्या दुधी भोपळ्याचा रंग खूप चमकदार असतो. डोळ्यांना तो खूप आकर्षक आणि चकाकणारा दिसतो. त्या उलट नैसर्गिकपणे पिकवल्या गेलेल्या दुधीच्या सालांवर चकचकीतपणा नसतो.

२. स्पर्श करूनही तुम्ही दुधी भोपळ्यातला फरक ओळखू शकता. जो दुधी भोपळा हाताला अगदी मऊसूत लागतो तो इंजेक्शन देऊन पिकवलेला असतो. 

 

३. ज्या दुधी भोपळ्याचा रंग पिवळसर हिरवट असतो तो नैसर्गिकपणे पिकवलेला असतो. जो दुधी भोपळा डोळ्यांना अगदी पोपटी रंगाचा दिसतो त्याला इंजेक्शन दिलेले असते.

Shravan Special : बंधू येतील गं न्यायला! पुरणावरणाची गोडी त्याला शिस्तीची जोड, श्रावणाच्या पदार्थांना माहेरची सय

४. बारकाईने पाहिल्यास इंजेक्शन दिलेल्या दुधी भोपळ्याच्या देठाच्या जवळ बारीकसे छिद्र किंवा सुईने ओरखडा मारल्याप्रमाणे व्रण दिसते आणि ती जागा थोडी मऊ झालेली असते.

५. नैसर्गिकपणे पिकलेल्या दुधी भोपळ्यामधला गर थोडा जाडसर असतो. तर इंजेक्शन दिलेल्या भोपळ्यामधला गर मऊ आणि शुभ्र पांढरा असतो.

 

Web Title: how to identify the differences between injected lauki or bottle gourd and non-injected lauki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.