lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 04:21 PM2024-05-09T16:21:16+5:302024-05-09T16:22:55+5:30

How To Identify Sweet Mango:आंबे खरेदी करताना बऱ्याचदा आपण फसतो. म्हणूनच आता अक्षय्य तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... (how to choose mango perfectly?)

How to identify sweet and fresh mango, 4 tips to identify ripe mango, how to choose mango perfectly? shopping tips for mango | बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

Highlightsबऱ्याचदा असं होतं की बाहेरून पिवळाधमक दिसणारा आंबा आपण घेतो. पण घरी आल्यावर तो आंबा खूपच आंबट निघतो.

खऱ्या अर्थाने आंबे खाण्याचा उत्सव सुरू हाेतो तो अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापासून (Akshay Tritiya 2024). आजही अनेक कुटूंब असे आहेत, जे अक्षय्य तृतीयेपर्यंत अजिबात आंबे खात नाहीत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात भरपूर आंबे आलेले असतात. पण बऱ्याचदा असं होतं की बाहेरून पिवळाधमक दिसणारा आंबा आपण घेतो. पण घरी आल्यावर तो आंबा खूपच आंबट निघतो. त्यामुळेच फक्त रंग पाहूनच आंब्याची खरेदी करू नका. कारण हल्ली वेगवेगळे केमिकल्स वापरून आंबे पिकवले जातात (How to identify sweet and fresh mango). त्यामुळे ते नुसतेच पिकतात, पण त्यांच्यात गोडवा येत नाही (4 tips to identify ripe mango). म्हणूनच पिकलेला गोड आंबा घ्यायचा असेल तर आंबे खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा....(how to choose mango perfectly?)

 

आंबा गोड आहे की आंबट हे कसं ओळखणार?

१. आंबा गोड आहे की आंबट आहे हे ओळखण्याच्या काही खास टिप्स आहेत. त्यात अर्थात पहिल्या क्रमांकावर आहे तो आंब्याचा रंग. आंबा पिवळा, नारंगी रंगाचा असेल तर तो घ्यावा.

बघा फळं- भाज्या चिरण्याची योग्य पद्धत! त्यांच्यातला पौष्टिकपणा घालविणाऱ्या 'या' ५ चुका टाळा

पण फक्त तेवढंच पाहू नये. कारण वर म्हटल्यानुसार बाहेरून पिवळा दिसणारा आंबा चवीला गोड असेलच असे नाही.

 

२. आंब्याचा खालचा म्हणजेच देठाच्या विरुद्ध बाजुने असलेला भाग थोडासा दाबून पाहावा. जर बोटाने थोडंसं दाबल्यानंतर तो दबल्या गेला तर तो आंबा गोड असण्याची शक्यता असते.

उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करून पाहा, उन्हाळा होईल सुसह्य...

३. आंब्याचा सुगंध घेऊन पाहा. कारण पिकलेल्या गोड आंब्याचा सुगंध अजिबात लपून राहात नाही.

४. आंब्याचा देठाकडचा भाग थोडा खोलगट झालेला असेल तर तो आंबा पिकलेला आणि गोड असतो.

 

Web Title: How to identify sweet and fresh mango, 4 tips to identify ripe mango, how to choose mango perfectly? shopping tips for mango

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.