Lokmat Sakhi >Food > सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा...

सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा...

How to Identify Adulteration in Ghee: सणावाराच्या दिवसांत तुपामधली भेसळ वाढताना दिसते. म्हणूनच या दिवसांत तुपाची खरेदी थोडी सावधपुर्वकच करायला हवी.(simple tricks and tips to find adulteration in ghee)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2025 15:03 IST2025-09-13T15:02:40+5:302025-09-13T15:03:38+5:30

How to Identify Adulteration in Ghee: सणावाराच्या दिवसांत तुपामधली भेसळ वाढताना दिसते. म्हणूनच या दिवसांत तुपाची खरेदी थोडी सावधपुर्वकच करायला हवी.(simple tricks and tips to find adulteration in ghee)

how to identify adulteration in ghee, simple tricks and tips to find adulteration in ghee | सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा...

सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा...

Highlightsहल्ली तुपामध्ये कपाशीच्या बियांचं तेल, वेगवेगळे मिनरल ऑईल, पाम ऑईल असे कित्येक हानिकारक पदार्थ मिसळलेले असतात.

गौरी- गणपती झाले आणि त्यापाठोपाठ पितृपक्ष सुरू झाले. आता पितृपक्ष सरताच नवरात्र आणि त्यानंतर दिवाळीची धूम सुरू होणार. या सगळ्याच दिवसांमध्ये लोक गोडाधोडाचे वेगवेगळे पदार्थ करतात. एकत्र येऊन सणवार साजरे केले जातात. अशावेळी वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी हमखास तुपाचा वापर केलाच जातो. म्हणूनच या दिवसांत तुपाची मागणी प्रचंड वाढलेली असते. ती पुरविण्यासाठी मग कित्येक विक्रेते तुपामध्ये भेसळ करतात आणि शुद्ध तुपाच्या नावाखाली ते विकतात. यामुळे आपले पैसे तर वाया जातातच शिवाय आरोग्यालाही खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळेच या दिवसांत तुपाची खरेदी नेहमीच थोडी विचारपुर्वक करायला हवी.(simple tricks and tips to find adulteration in ghee)

 

तुपामधली भेसळ कशी ओळखायची?

इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्री ॲण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांच्या अभ्यासानुसार हल्ली तुपामध्ये कपाशीच्या बियांचं तेल, वेगवेगळे मिनरल ऑईल, पाम ऑईल असे कित्येक हानिकारक पदार्थ मिसळलेले असतात. सणवाराच्या दिवसांत कित्येक पदार्थ तुपामध्येच केले जातात. किंवा पोळी, पराठा यांनाही आपण तूप लावूनच खातो. त्यामुळेच जर हे हानिकारक पदार्थ वारंवार आपल्या पोटात गेले तर त्यातून हृदयरोग, पचनविकार, कॅन्सर असे कित्येक आजार उद्भवू शकतात. हे सगळं टाळण्यासाठी तुपामधली भेसळ आपल्या लक्षात यायला हवीच. त्यासाठीच पुढे सांगितलेल्या काही गोष्टी नक्कीच मदत करतील.

१. थोडंसं तूप तुमच्या तळहातावर घ्या आणि दोन्ही तळहात एकमेकांवर चोळा. जर हातांच्या उष्णतेमुळे तूप वितळून गेलं तर ते शुद्ध आहे. पण जर काही तूप विरघळलं आणि तुपाचे काही दाणे तुमच्या हातावर बराच वेळ तसेच राहीले तर ते तूप मात्र भेसळीचं असू शकतं.

 

२. अर्धा चमचा तुपामध्ये २ ते ३ थेंब आयोडिन घाला. जर तुपाचा रंग निळसर झाला तर त्यामध्ये स्टार्च आहे हे लक्षात घ्या. 

३. एक ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यावर तुपाचे काही थेंब घाला. जर तूप पाण्यावर तरंगलं तर ते शुद्ध आहे. जर त्याची गोळी बनून ते अगदी चटकन ग्लासच्या तळाला गेलं तर ते भेसळीचं असू शकतं.

४. जेवढं तूप घेतलेलं असेल तेवढंच त्यामध्ये कॉन्संट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड घाला. ५ ते ७ मिनिटांनंतर जर तुपाला लालसर रंग आला असेल तर ते तूप भेसळीचं आहे.  



 

Web Title: how to identify adulteration in ghee, simple tricks and tips to find adulteration in ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.