Lokmat Sakhi >Food > दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप

दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप

How To Increase Malai in Milk : दुधावर जाड साय येण्यासाठी जुन्या काळापासून या ट्रिक्स फॉलो केल्या जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 19:07 IST2025-08-22T18:19:02+5:302025-08-22T19:07:41+5:30

How To Increase Malai in Milk : दुधावर जाड साय येण्यासाठी जुन्या काळापासून या ट्रिक्स फॉलो केल्या जात आहेत.

How To Get Thick Malai From Milk : Kitchen Hacks How To Increase Malai in Milk | दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप

दुधावर जाडजूड साय येण्यासाठी पाहा दूध तापवण्याची खास ट्रिक, घरीच करा भरपूर साजूक तूप

रोज दूध गरम केल्यानंतर दूधाला फारशी साय येत नाही, साय पातळ असते अशी तक्रार अनेकांची असते. तुम्हालाही असं वाटत असेल तर काही टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. यामुळे फक्त साय येत नाही तर तुम्ही जास्त प्रमाणात घरगुती साजूक तूपही बनवू शकता. (How to get more malai from milk)

व्यवस्थित उकळी येऊ द्या
फूड ब्लॉगर पूनम देवनानी यांनी दुधावर जाड मलई येण्यासाठी 1 सोपी ट्रिक सांगितली आहे (How To Increase Malai in Milk). ज्यामुळे तुमचं रोजचं काम अधिकच सोपं होईल. अनेक वर्षांपासून हा उपाय प्रचलित आहे. दुधावर जाड साय येण्यासाठी जुन्या काळापासून या ट्रिक्स फॉलो केल्या जात आहेत.

पूनम देवनानी सांगतात की तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर एकदम घट्ट फूल क्रिम दूध घ्या. जाड मलई येण्यासाठी दूध व्यवस्थित उकळायला हवं. लोक दूधाला उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करतात. पण दूध एका मोठ्या भांड्यात ठेवून मंद आचेवर उकळवायला हवं.

ढाबास्टाईल चमचमीत दाल फ्राय घरीही करता येईल फक्त १५ मिनिटांत, जमवा जिरा राईस दाल फ्रायचा बेत

दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा आणि जवळपास 10 ते 15 मिनिटं उकळवून घ्या. या दरम्यान दूध वारंवार चमच्यानं ढवळू नका. दुधाला मंद आचेवर जितकं उकळाल तितकं त्यातील पाणी वाफ बनून कमी होईल आणि फॅट कॉन्संट्रेशन वाढेल. या उपायानं दुधावर जाय साय येईल.

दुधाला जाडसर साय हवी तर या चुका करणं टाळा

लोक ही चूक वारंवार करतात ते म्हणजे उकळतं दूध पूर्णपणे झाकून ठेवतात. उकळल्यानं त्यातील पाणी वाफेद्वारे निघून जाईल. याच पद्धतीनं न झाकता दूध थंड करा. तु्म्ही छिद्र असलेलं झाकण किंवा चाळणीनं झाकू शकता. पण त्यावर पाण्याचे थेंब तयार झाले तर ते दुधात पडतील. ज्यामुळे साय पातळ होईल.

दूध थंड कसं करावं?

दूध उकळ्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे दूध व्यवस्थित थंड करणं.  गरम दूध फ्रिजमध्ये लगेच ठेवू नका. दूध गॅसच्या आचेवरून उतरवून रूम टेम्परेचरला थंड होऊ द्या. दूध व्यवस्थित थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा.

 कमी ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, पाहा १० नाजूक-सुंदर डिजाईन्स, रोज वापरता येतील

गरम दूध फ्रिजमध्ये ठेवल्यानं दुधाचं फॅट व्यवस्थित तयार होत नाही आणि साय घट्ट होते. गरम दूध फ्रिजमध्ये ठेवल्यानं साय पातळ राहते. दूध थंड करण्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे रूम टेम्परेचरवर दूध ठेवा. जर तुम्ही दूध रात्री गरम करत असाल तर ते झाकून किचनमध्येच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर दुधावर जाडसर साय जमा होईल.

Web Title: How To Get Thick Malai From Milk : Kitchen Hacks How To Increase Malai in Milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.