दुधाला घट्ट साय यावी असं प्रत्येकालाच वाटतं कारण दूधाच्या सायीपासून घरच्याघरी शुद्ध, साजूक तूप तयार करता येतं. पण सर्वांच्याच घरी आणल्या जाणाऱ्या दुधाला घट्ट साय येतेच असं नाही. सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही दुधाला घट्ट साय आणू शकता. या ट्रिक्स दुधाला भाकरीसारखी घट्ट साय आणण्यासाठी उपयोगी ठरतील. (How To Get Thick Layer Malai On Packet Milk)
दुधाची साय हा भारतीय स्वंयपाकघरातील एक महत्वाचा पदार्थ आहे. काही लोक चहाची चव वाढवण्यासाठी त्यात दुधाची साय घालतात तर काहीजण तूप बवनतात. पण पॅकेटबंद असलेल्या पिशवीच्या दुधाला घट्ट साय येत नाही अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. (How To Get Thick Malai On Milk)
दुधाला घट्ट साय येत नसेल तर हा उपाय करा (Easy Trick To Get Thick Malai On Milk)
दूध योग्य पद्धतीनं उकळवून घेतल्यास दुधाला घट्ट साय येते. त्यासाठी तुम्ही १ छोटा उपाय करू शकता ज्यामुळे घट्ट साय येईल. फक्त २ ते ३ दिवसांच्या घट्ट सायीचे तुम्ही तूप बनवू शकतात. दुधाला जाड साय येण्यासाठी सगळ्यात आधी एक स्वच्छ भांडं घ्या. जेणेकरून त्यात घाण किंवा कसलेही कण राहणार नाहीत.
जवळपास दीड लिटर दुधात अर्धा ग्लास पाणी मिसळा. ज्यामुळे दूध हळूहळू गरम होईल आणि खाली चिकटणार नाही. दूध गरम करताना आच मंद ठेवा.
भांड्याच्या कडेला थोडं तूप लावा जेणेकरून दूध उकळून उतू जाणार नाही. ही पद्धत जुन्या काळापासून प्रचलित आहे.
जेव्हा दूध व्यवस्थित गरम होईल तेव्हा त्यात ६ ते ७ तांदळाचे दाणे घाला आणि चमच्यानं व्यवस्थित ढवळून घ्या. तांदूळातील स्टार्च दुधाचा जाड थर तयार करण्यास मदत करतो. ज्यामुळे साय जाड येते आणि दुधाच्या चवीवर कोणताही परिणाम होत नाही.
जेव्हा दूध व्यवस्थित उकळेल तेव्हा गॅस बंद करा आणि लगेच झाकण ठेवा. झाकण लावल्यामुळे वाफ आतच राहते आणि साय घट्ट होते.
दुधावर पूर्ण झाकण ठेवण्याऐवजी जाळीचे झाकण ठेवा. यामुळे वाफ बाहेर येते आणि धूळ आत जाऊ शकत नाही. यामुळे साय कोरडी होते.
दूध रूम टेम्परेचरवर आल्यानंतर ४ ते ५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड साय जाड आणि व्यवस्थित होते. या पद्धतीनं २ ते ३ दिवस दूध उकळवून घेतल्यास भरपूर घट्ट साय जमा होईल.
Web Summary : Want thick cream from packet milk? Boil it right! Add a little water and rice grains while heating on low. Cool, then refrigerate for a rich layer. Enjoy homemade ghee!
Web Summary : पॉकेट के दूध पर मोटी मलाई चाहिए? उबालते समय थोड़ा पानी और चावल के दाने मिलाएं। ठंडा करें, फिर एक समृद्ध परत के लिए रेफ्रिजरेट करें। घर का बना घी का आनंद लें!