बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असते. व्हिटॅमिन बी १२ हा शरीरातला एक महत्त्वाचा घटक आहे. ते जर शरीरात कमी प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम थेट मज्जासंस्थेवरही होऊ शकतो. हातापायांना मुंग्या येणं, डोकं सुन्न होणं, हात- पाय कापणं, कोणताही निर्णय चटकन न घेता येणं हे सगळे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता सांंगणारे लक्षणं आहेत. शरीरातली व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी अनेकजण बी १२ चे सप्लिमेंट्स घेतात. पण डाॅक्टर असं सांगतात की काही शाकाहारी पदार्थ तुम्ही नियमितपणे खाल्ले तर शरीराला नेहमीच पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळेल. त्यासाठी कोणता पदार्थ खायला हवा ते पाहूया..(veg food to get rid of vitamin b 12 deficiency)
शरीरातली व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढणारे पदार्थ
मूग जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्यातून व्हिटॅमिन बी १२ पुरेशा प्रमाणात मिळू शकते. यासाठी मूग स्वच्द धुवा आणि ७ ते ८ तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर त्यातलं पाणी पुर्णपणे काढून घ्या आणि ते मोड येण्यासाठी ठेवून द्या.
विकतचे मसाले कशाला? घरीच तयार करा सुपरटेस्टी मसाला- भाजी, पराठे, आमटीला येईल झकास चव
मोड आलेले मूग थोडे शिजवून खाणे खूप फायदेशीर ठरते. मूग शिजवताना त्यात हिरव्या भाज्या, बीटरुट, पनीर असे पदार्थही घालू शकता. या प्रकारचा नाश्ता जर तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ वेळा केला तर शरीरातली व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता लगेच भरून निघू शकते, असं डॉक्टर सांगतात.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढणारे इतर शाकाहारी पदार्थ
दूध, चीज, पनीर, प्लेन योगर्ट अशा दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातूनही शरीरातली व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून निघू शकते.
याशिवाय मशरूमचे वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानेही शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ मिळते.
काय सांगता! पांढऱ्या केसांचा थेट कॅन्सरशी संबंध? तुमचेही केस कमी वयात पिकले असतील तर...
मेथी, पालक यासारख्या हिरव्या भाज्या तसेच बीट, डाळिंब यासारखी फळं शरीरात व्हिटॅमिन बी १२ शाेषून घेण्यास मदत करते. त्यामुळे हे पदार्थही नियमितपणे खायला हवे.
हल्ली बाजारात फोर्टीफाईड फूड मिळतात. त्या पदार्थांच्या माध्यमातूनही व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढता येते.
 
