Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पाण्यात पुरी तळण्याची ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता पुरी खाण्याची मजा-पाहा कशी करायची..

पाण्यात पुरी तळण्याची ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता पुरी खाण्याची मजा-पाहा कशी करायची..

How To Fry Puri In Water : तळलेल्या पुरीच्या तुलनेत यात खूपच कमी कॅलरीज असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:03 IST2026-01-18T15:30:10+5:302026-01-19T13:03:53+5:30

How To Fry Puri In Water : तळलेल्या पुरीच्या तुलनेत यात खूपच कमी कॅलरीज असतात.

How To Fry Puri In Water : Oil Free Puri Making Tips How To Make Less Oily Puri | पाण्यात पुरी तळण्याची ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता पुरी खाण्याची मजा-पाहा कशी करायची..

पाण्यात पुरी तळण्याची ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता पुरी खाण्याची मजा-पाहा कशी करायची..

तेलात न तळता किंवा अत्यंत कमी तेल वापरून पुरी करणं ही एक आरोग्यासाठी एक उत्तम संकल्पना आहे. ज्यांना हृदयविकार, मधुमेह आहे किंवा जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी पाण्यातील पुरी हा उत्कृष्ट पर्याय ठरेल. म्हणजेच पुरी खाण्यासाठी आता मन मारावं लागणार नाही (How To Fry Puri In Water). थोडं विचित्र वाटू शकतं पण ही एक पारंपारीक पद्धत आहे. (Oil Free Puri Making Tips) बरेच लोक जास्त तेल शरीरात जाऊ नये म्हणून पुरी खाणं टाळतात पण तेलाशिवाय पुरी करणं एकदम सोपं आहे.

पाण्यात पुरी करण्याची सोपी रेसिपी

सर्वात आधी गव्हाच्या पीठात, मीठ आणि ओवा घालून घट्ट पीठ मळून घ्या. लक्षात ठेवा पीठ सैल नसावं. अन्यथा पुऱ्या पाण्यात तुटू शकतात. पीठ मळल्यानंतर १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा.

पिठाचे लहान गोळे करून मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्या. पुऱ्या खूपच पातळ लाटू नका. कारण त्या पाण्यात टाकल्यावर  तुटू शकतात.

एका मोठ्या पसरट भांड्यांत पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळ आल्यावर त्यात थोडं मीठ घाला. जेव्हा पाण्याला चांगली उकळ येईल तेव्हा त्यात एक एक करून पुरी सोडा. पुरी सुरूवातीला भांड्यांच्या तळाला बसेल पण  जशी ती शिजेल तशी आपोआप पाण्यावर तरंगू लागेल. पुरी वर तरंगायला लागली की समजावे शिजली आहे. साधारण २ ते ३ मिनिटं दोन्ही बाजूंनी पुरी नीट शिजू द्या.

पाण्यातून काढलेल्या पुऱ्या थोड्या ओल्या असतात. त्या तुम्ही तशाच खाऊ शकता किंवा थोडा कुरकुरीतपणा हवा असेल तर नॉन स्टिक पॅनवर हलक्या गरम करू शकता  किंवा एअर फ्रायरमध्ये  ३ ते ४ मिनिटं ठेवू शकता.

या पद्धतीचे फायदे

यात तेलाचा वापर नसल्यामुळे ही पुरी हृदयासाठी सुरक्षित आहे.

तळलेल्या पुरीच्या तुलनेत यात खूपच कमी कॅलरीज असतात.

वाफवलेले अन्न पचायला सोपे असते. या पुऱ्यांची चव तळलेल्या पुऱ्यापेक्षा काहीशी वेगळी लागते.

या पुऱ्या तुम्ही तिखट चटणी किंवा रस्सा भाजीसोबत गरमागरम खाऊ शकता.

Web Title : तेल-मुक्त पुरी: पानी में पुरी तलें, एक स्वस्थ पाक कला!

Web Summary : पानी में उबालकर बिना तेल के स्वस्थ पूरियां बनाएं। यह पारंपरिक तरीका स्वास्थ्य के प्रति जागरूक लोगों और आहार प्रतिबंध वाले लोगों के लिए आदर्श है। चटनी या ग्रेवी के साथ तेल-मुक्त पूरियों का आनंद लें।

Web Title : Oil-free Puri: Fry Puri in water, a healthy cooking trick!

Web Summary : Make healthy puris without oil by boiling them in water. This traditional method is ideal for health-conscious individuals and those with dietary restrictions. Enjoy oil-free puris with chutney or gravy.